Home चंद्रपूर धक्कादायक :- मनपाने नोटीस न देता शिल्पा बनपूरकर या बाळंतीण महिलेचे वॉल...

धक्कादायक :- मनपाने नोटीस न देता शिल्पा बनपूरकर या बाळंतीण महिलेचे वॉल कंपाउंड़ पाडले.

नियमांची पायमल्ली करून बांधकाम तोडण्याच्या मनपा आयुक्त आणि महापौर यांच्या बेकायदेशीर आदेशावर कारवाई कोण करणार ?

चंद्रपूर :-

महानगर पालिका चंद्रपूर मार्फत कायदा हातात घेवून चुकीच्या पद्धतीने दि. २७/०७/२०२० ला प्रफुल तिलकचंद बनपुरकर यांचे पक्क्या वाल कंपाऊंडचे बांधकाम तोड़ल्यामुळे आता मनपा आयुक्त व सहआयुक्त  आणि इतर कर्मचारी यांच्या मनमानी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रफुल बनपुरकर आणि त्यांची पत्नी शिल्पा बनपूरकर यांनी डिजिटल मीडिया असोसिएशन’च्या प्रेस वार्ता मध्ये सांगितले आहे की मनपाने हेतुपूर्वक माझ्या घराचे  वॉल  कंपाऊड पाडले एवढेच नव्हे तर  मलाच नाला
बाधन्यासाठी पैसे द्या असा उलट सल्ला मनपा कडून दिला गेला असून मी  एकटी असताना व मी विनवणी केली असताना सुद्धा  कुठलाही नोटीस न देता माझे १ लाख ६० हजार रू. आथिर्क नुकसान केले.त्यामुळे माझ्या हक्कासाठी मी ओली बाळंतीण असून सुद्धा मी आपल्या प्रसारमाध्यमांकडे न्याय मागण्यासाठी माझे छोटेशे बाळ घेवून आहे इथे आले असे भावनिक विधान शिल्पा बनपूरकर यांनी केले व त्याची नुकसान भरपाई मला द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी प्रफुल बनपुरकर यांनी सांगितले की मनपाच्या पूर्वी २०१८ ला झालेल्या नालीच्या बांधकामा नंतर सन २०१९ मध्ये वाल कंपाउंडचे अंदाजे 3, फूट जागा सोडून बांधकाम करण्यात आले होते.परंतु ज्यांचे घरचं नाल्यावर आहे  त्यांचे बांधकाम न तोडता आयुक्त सचिन पाटील म.न.पा. चंद्रपूर यांनी इतर पूर्वसूचना न देता किव्हा कोणताही नोटीस न देता मनमानीने व सुडबुद्धीने माझे  पक्के बांधकाम तोडले. तोडफोड करतेवेळी घर मालक घरी हजर नसतांना आणि त्यांचे पत्नीला धमकावून जबरदस्तीने बांधकाम तोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या त्यांच्या पत्नीचे नुकताच एक महिन्यापूरी बाळपण झाल्याने त्यांचे कुटुंब मानसिक तणावात आहे.

एकीकडे जनप्रतिनिधी म्हणून निवडून आलेली नगरसेविका नीलम आक्केवार यांनी कोणत्याच प्रकारची दखल न घेता जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करीत आहे तर दुसरीकडे सचिन पाटील  सहा. आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांचे द्वारे पदाचा गैर वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  बनपूरकर यांचे घराचे मौका पाहणी करून शासन प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन न्याय व अधिकार देण्याची मागणी शिल्पा बनपूरकर व प्रफुल्ल बनपुरकर यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here