Home गडचिरोली धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी जुन्याच कामाची दुरुस्ती करून केली...

धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी जुन्याच कामाची दुरुस्ती करून केली लाखोंची उचल !

 

सोनटक्के यांच्या भ्रष्ट लीला वनविभागाच्या पथ्यावर, कारवाई ची मागणी !

 

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्रात सोनटक्के यांच्या भ्रष्ट कारणाम्याची यादी फार लंबी असून त्यांच्या माध्यमातून वनविभागाला कोट्यावधी रुपयाचा फटका बसल्याची माहिती आहे. अतिशय चपळ आणि तल्लक बुद्धीने सगळ्या वनविभागातील अधिकारी कर्मचारी यांना मैनेज करून पत्रकारांना सुद्धा आर्थिक रसद पोहचवून वन विभागातील कोट्यावधीचा भ्रष्टाचार लपविन्याचे पातक करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा पुन्हा एकदा नवा कारनामा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्वर्टची कामे, मनरेगा रोहयोची कामे, दगडी बंधाऱ्याची कामे केवळ दुरुस्ती करून करून लाखो रुपये त्यांनी हडप केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते तेव्हा पासून सन 2018 – 19 पर्यंत पाणवटे कल्वर्ट, वनतळे, दगडी बंधारे, व इतर कामे करण्यात आली होती परंतु, सध्या कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी सोनटक्के ह्यांनी त्याच कामाला दुरुस्ती करून करून जिल्हा वार्षिक योजना,आदिवासी विकास योजना अन्तर्गत निधी प्राप्त करून लाखो रुपये हडप केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या सम्पूर्ण परिक्षेत्राची क,न.निहाय झालेल्या कामाची यादी gpsफोटोसह तयार करावी. व आता सोनटक्के यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची सुद्धा फोटो सह यादी बनवून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी होत आहे।

Previous articleधक्कादायक :- मनपाने नोटीस न देता शिल्पा बनपूरकर या बाळंतीण महिलेचे वॉल कंपाउंड़ पाडले.
Next articleराजगर्जना :- किती काळ लॉक डाऊनमुळे लोकांची फरफट करणार ? राजसाहेब ठाकरे यांचा सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here