Home महाराष्ट्र राजगर्जना :- किती काळ लॉक डाऊनमुळे लोकांची फरफट करणार ? राजसाहेब ठाकरे...

राजगर्जना :- किती काळ लॉक डाऊनमुळे लोकांची फरफट करणार ? राजसाहेब ठाकरे यांचा सरकारला सवाल

लक्षवेधी :-

देशात आणि राज्यात सद्ध्या कोरोना महामारीमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे याबाबत सरकारने ठोस असा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देणे आवश्यक असताना राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीय, दिसला नाही. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे, पण त्याचा बाऊ खूप केला गेला. अशा प्रकारचे गंभीर विधान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एबीपी माझा या न्यूज चैनेल ला दिलेल्या मुलाखतीत केले, ते पुढे म्हणाले की मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये माणसे कुठून क्वारंटाईन होणार ? लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. आता सगळं सुरळीत करावंच लागेल.कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल, असंही राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या; पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं, असं म्हणत राजसाहेब ठाकरे यांनी विरोधकांनाही चिमटा काढला.
राज्यातील महा विकास आघाडी सरकार विषयी विचारले असता ते म्हणाले की राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. कारण या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीय. कुठलाही ताळमेळ जाणवत नाहीय, असं भाकीतही त्यांनी केलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राजसाहेब ठाकरे यासंदर्भात पुढं म्हणाले की, ज्या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विचारधारेचे तीन पक्ष आले, तेव्हाच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकीत मी केलं होतं. कुठल्याही मंत्र्यांचा एकमेकांशी संवाद नाही. सध्याच्या स्थितीत त्यांच्यातील कुरबुरी बघता या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ असलेला दिसून येत नाही, असं राजसाहेब ठाकरे म्हणाले.

माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडला आहे, जेंव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेव्हा मी तो घडवेन. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं माझा स्वप्न आहे, त्यासाठी जनतेनी आशीर्वाद द्यावा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here