Home गडचिरोली धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची विभागीय चौकशी करणारे अधिकारीच चौकशीच्या...

धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची विभागीय चौकशी करणारे अधिकारीच चौकशीच्या घेऱ्यात ?

 

विभागीय चौकशी अधिकाऱ्यांची सुनील सोनटक्के यांना क्लिंनचीट ?

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचार संदर्भातील मालिका भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सध्या वन विभागात गाजत असून काही प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी हे या प्रकरणात सोनटक्के यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपले मत व्यक्त करीत आहे. तर दुसरीकडे या सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचारांच्या कामाची विभागीय चौकशी करणारे अधिकारी मात्र जणू सुनील सोनटक्के यांना क्लिंनचीट देताय की काय ? अशा चर्चा रंगत असल्याने आता स्वतः चौकशी अधिकारीच चौकशीच्या घेऱ्यात अडकले असल्याची माहिती आहे।

वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांनी कुरखेडा वनपरिक्षेत्रात विविध कामातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असून त्या वन क्षेत्रातील जंगलच हडप करण्याचा त्यांचा बेत समोर आला आहे मात्र हे सगळं विदारक चित्र डोळ्यासमोर दिसत असताना वन विभागातील वरिष्ठ अधिकारी नेमके काय करीत होते ? हा गंभीर प्रश्न आहे.

आता वनविभागाच्या या अधिकाऱ्यांनी स्वतःचा बंगला बांधला आणि कोट्यावधीची स्थावर मालमत्ता जमवली यावरून त्यांनी भ्रष्टाचार केला आहे हे प्रथमदर्शनी शीद्ध होत असलं तरी आपण किती पाक साफ आहोत हे दर्शविण्यासाठी ते संपादक यांच्या विरोधात म्हणे न्यायालयात जाणार आहे. पण आता विभागीय चौकशी करणारे अधिकारी नेमके काय भूमिका घेतात आणि खरोखरच ते देशाच्या राष्ट्रीय संपती ची अफरातफर करणाऱ्या सोनटक्के यांना अर्थपुर्ती ने क्लिंनचीट देतात की त्यांचा भ्रष्टाचार उघड करतात हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर मध्ये एकाच दिवशी 57 बाधिताची रेकॉर्डब्रेक नोंद. एकूण कोरोना बाधितांचा आकडा 682.
Next articleपोलिसांना देता हफ्ता तर मग आम्हालाही द्या.. नेत्यांनी मागितला आपला अधिकार??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here