Home भद्रावती क्राईम ब्लास्ट:- सुनील तुम्मे या गुंडाची गणेश मंदिराच्या गेट समोर दारू व...

क्राईम ब्लास्ट:- सुनील तुम्मे या गुंडाची गणेश मंदिराच्या गेट समोर दारू व गांजाची सर्रास विक्री ?

भद्रावती पोलीस स्टेशन मधील सचिन व भीमराव पडोळे यांची अवैध वसुली ?

भद्रावती प्रतिनिधी :-

मागील अनेक वर्षापासून भद्रावती पोलीस स्टेशन मधे गोपनीय विभागात कार्यरत भीमराव पडोळे यांनी पोलीस वेरिफिकेशन च्या नावावर हजारो लोकांकडून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम लाच म्हणून घेवून लाखो रुपये बेकायदेशीर कमाई केल्यानंतर आता पोलिस निरीक्षक पवार यांच्या छत्रछायेत डी बी स्कॉड मधे सुद्धा हप्ता वसुली चे टेंडर त्यांनी घेतल्याची माहिती आहे तर दुसरीकडे सचिन गुरनुले सुद्धा अनेक वर्षापासून इथे अवैध दारू विक्रेत्यांकडून वसुलीचे काम करीत असल्याची खास माहिती आहे. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींना ठाणेदार पवार व डी बी स्कॉड इंचार्ज पोलीस अधिकारी यांची मुकसंमती आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार गणेश मंदिराच्या प्रवेश द्वारापुढे दारू व गांजाची सर्रास विक्री सुनिल तुम्मे नावाचा गुंड करत आहे. सदर विक्री बाबत लोकांच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन मधे असल्या तरी भीमराव पडोळे व सचिन गुरनुले यांच्या नियनित हप्ता वसुली मुळे सुनील तुम्मे हा राजरोसपणे हा धंदा चालवीत असून मंदिराच्या प्रवेश दारापुढेच त्यांनी आपले दुकान थाटले आहे. त्यांनी इथे जणू एखादी अधिक्रुत दारुभट्टि असल्याप्रमाणे दारूच्या खुल्या स्वरुपात व्यवसाय सुरु केला आहे. त्या दुकानमध्ये थंड बीसलरीचे पाणी व पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लासाची व्यवस्था केली आहे. त्या दुकानामध्ये केवळ देशी विदेशी दारूच पिणारेच नाही तर गांजा पिणारे, आंबट शोकीन सुद्धा लोक तिथे येतात. त्यामुळे धार्मिक परिसरातील धार्मिक वातावरण ढवळून निघत आहे. या परिसरातील वृद्ध महिला, पुरुष या सर्वांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कारण बहुतांश त्या दुकानातून दारू पिऊन येणा-या लोकांचे परिसरात भांडणे होतात व ते एकमेकांस अश्लील शिवीगाळ करतात. त्यामुळे तेथून येणा-या जाणा-या सुज्ञ नागरिकांचे येणे-जाणे अत्यंत त्रासदायक झाले आहे. या परिसरात वृद्ध लोक बसलेले
असतात. परंतु त्यांनी काही या दारुड्यांना म्हटले तर त्यांना धमकावले जाते. कारण सुनील तुम्मे हा इसम गुंड प्रवृत्तीचा असल्याने भीतीपोटी गणपती वार्डातील प्रवेश द्वारापुढे जनतेला बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय रहात नाही.त्यामुळे अशा गुंडांचा बंदोबस्त लावावा याकरिता एका सामजिक संघटनेतर्फे नुकतेच भद्रावती पोलीस स्टेशन मधे ठाणेदार पवार यांना निवेदन दिले असले तरी भीमराव पडोळे व सचिन गुरनुले या जोडगोळीने हप्ता वसुली करून त्या अवैध धंदेवाईक यांना बळ दिले असल्याने येथील अवैध दारू विक्रेत्यांचा बाजार कुणी उठवू शकत नाही. त्यामुळेच भीमराव पडोळे व सचिन गुरनुले यांची हप्ता वसुली अवैध दारू गांजा विक्री करणाऱ्या व सट्टापट्टी घेणाऱ्याचे बळ वाढवीत असल्याने या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here