Home चंद्रपूर चिंताजनक ;- तीन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 152,

चिंताजनक ;- तीन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 152,

आज चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या वाढली 28 ने यार एकूण संख्या 777. आत्तापर्यंत 438 जणांना रुग्णालयातून सुट्टी.339 बाधितावर सध्या उपचार सुरू

चंद्रपूर दि. ७ ऑगस्ट :-

चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या 24 तासात त्यामध्ये 28 बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हा आकडा 152 वर पोहचला असून आत्तापर्यंत 777 बाधित पुढे आले आहे तर  438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे आणि  339 बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये 17 नागरिक अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहेत. यामध्ये एकट्या बल्लारपूर शहरातील 15 लोकांचा समावेश आहे. तर उर्वरित एक जण चुना भट्टी वार्ड राजुरा येथील रहिवासी आहे. अॅन्टीजेन चाचणीत अन्य 17 वा बाधित चंद्रपूर बसस्थानक परिसरात सिद्धार्थ हॉटेलजवळील आहे. या ठिकाणच्या 54 वर्षीय एका पुरुषाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नियमित चाचणीद्वारे पुढे आलेल्या बाधितांमध्ये व्दारका मार्केट नगीनाबाग परिसरातील 36 वर्षे पुरुषाचा समावेश आहे. तर गोरक्षण वार्डातील 42 वर्षीय वर 23 वर्षीय महिलेचा देखील समावेश आहे. या दोन्ही महिला संपर्कातून पॉझिटिव्ह झाल्या आहेत.बल्लारपूर येथून श्रीराम वार्ड परिसरातून 13 वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. तर नागपूर येथून प्रवासाची नोंद असलेला माता नगर चंद्रपूर येथील 35 वर्षीय पुरुष तसेच पुणे येथून प्रवासाची नोंद असलेल्या 28 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
समता नगर परिसरातील 34 वर्षीय महिला तसेच गणेश नगर चंद्रपुर येथील 45 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.
वरोरा येथील उत्तर प्रदेशातून प्रवास करून आल्याची नोंद असणारे सुभाष वार्ड परिसरातील 50 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तर भद्रावती शहरातील वंधेरे सोसायटी येथील 26 वर्षीय युवक हा संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
17अॅन्टीजेन चाचणीतून पुढे आलेले व नियमित चाचणीतून पुढे आलेल्या 11 बाधितांमुळे एकूण संख्या 28 झाली आहे.

Previous articleक्राईम ब्लास्ट:- सुनील तुम्मे या गुंडाची गणेश मंदिराच्या गेट समोर दारू व गांजाची सर्रास विक्री ?
Next articleसनसनिखेज :- भद्रावती पोलिस स्टेशन मधील भीमराव पडोळे यांचा अवैध वसुली अड्डा सरकारी रूग्णालयासमोर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here