Home भद्रावती सनसनिखेज :- भद्रावती पोलिस स्टेशन मधील भीमराव पडोळे यांचा अवैध वसुली अड्डा...

सनसनिखेज :- भद्रावती पोलिस स्टेशन मधील भीमराव पडोळे यांचा अवैध वसुली अड्डा सरकारी रूग्णालयासमोर ?

 

गोपनीय विभागात असताना सुद्धा अवैध दारू विक्री, सट्टापट्टी, सुगंधी तंबाखू व वाळू तस्करी करणाऱ्यांकडून ठाणेदार यांच्या नावावर अवैध वसुली करणाऱ्या पडोळे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी !

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती पोलीस स्टेशन मधे मागील अनेक वर्षापासून गोपनीय विभागात एकछत्री राज्य निर्माण करून हजारो पोलिस वेरिफिकेशन करणाऱ्यांकडून पैसे घेवून लाखोंची माया जमविनारे व कंपनी कामगार सारख्या गोरगरीबांकडून सुद्धा पैसे घेवून मोठ्या प्रमाणात चल अचल संपती जमा करणारे, एवढेच नव्हे तर प्रत्त्येक ठाणेदार यांच्यासोबत चापलूसपणा करणारे भीमराव पडोळे हे भद्रावती पोलिस स्टेशन मधे एवढी वर्ष का आहे ? काय, यांची बदली होत नाही की वरिष्ठांची हे मर्जी सांभाळतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ठाणेदार यांचा खास वसुली अधिकारी म्हणून मिरविनाऱ्या भीमराव पडोळे यांना अवैध दारू, सट्टापट्टी, सुगंधी तंबाखू व रेती तस्कर हप्ता देण्यासाठी सरकारी रुग्णालयासमोरील वसुली अड्ड्यावर पोहचत असल्याची माहिती आहे.
खरं तर भीमराव पडोळे या पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात भद्रावती शहरातील जनतेत मोठा आक्रोश आहे. कारण हे जणू स्वतःच ठाणेदार असल्याच्या आविर्भावात राहतात व सर्वसामान्य जनतेला बंदोबस्तात विनाकारण शुल्लक कारणावरून तकलीफ देतात, त्यामुळे अगोदरच पोलीस वेरिफिकेशन च्या नावाखाली जनतेची आर्थिक लूट करणाऱ्या भीमराव पडोळे यांची अवैध व्यवसायिक यांच्या सोबत असलेली मैत्री व निरपराध लोकांवर त्यांच्याकडून दाखविण्यात येणारी दादागिरी यामुळे असले पोलीस कर्मचारी नकोच अशी भावना भद्रावतीकरांची आहे, त्यामुळे  भद्रावती पोलीस स्टेशन मधे राहून लाखोंची माया जमविनाऱ्या भीमराव पडोळे यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करावी व भद्रावती पोलिस स्टेशन मधून यांची हकालपट्टी करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleचिंताजनक ;- तीन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 152,
Next articleसैराट भ्रष्ट कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची वनमंत्र्यांकडे धाव,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here