News Now
Home > गडचिरोली > सैराट भ्रष्ट कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची वनमंत्र्यांकडे धाव,

सैराट भ्रष्ट कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची वनमंत्र्यांकडे धाव,

३१ मार्च पर्यंत गोठणगाव उपक्षेत्रात कुठलेही कामे करण्यात आले नसतांना सोनटक्के यांनी कोटीच्या बिलाची उचल केल्याची चर्चा ? बोगस कामांची चौकशी, लोकसुनावणी व चावडी वाचन केल्यास होणार पोलखोल ?

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र असलेल्या गोठणगाव अंतर्गत रोपवनाचे कामे न करता एक कोटीच्यावर रक्कमेचे बिल बनविण्यात आले असून ती रक्कम परस्पर हडप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोबतच वनविभागातील अनेक कामामध्ये बोगस मजूर दाखवून लाखो रुपयाची परस्पर उचल केली असल्याने या कामांचे सरकारी नियमानुसार चावडी वाचन किंव्हा लोक सुनावणी घेतल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचारांची पोलखोल होऊ शकते. मात्र आता आपल्या बोगस कामांची चौकशी होऊन आपल्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते त्यामुळे सैराट भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी वनमंत्र्यांकडे धाव घेवून चौकशी अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्रातील गोठणगांव उपक्षेत्रात कं.न. ९७१ मध्ये (मालदुगीबिट) उभ्या जंगलात पावड्याने खड्डे खोदलेले आहेत. खरं तर गोठणगाव उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक हेपट यांनी दि. ३१ मार्च ला सेवा निवृत्त होताना देवगडे क्षेत्र सहाय्यक यांना चार्ज दिला होता त्यावेळी त्यांनी चार्ज लिस्टमध्ये गोठणगाव उपक्षेत्रामध्ये दि. ३१ मार्च पर्यंत कोणतेही कामे करण्यात आलेली नाही असे चार्ज लिस्ट मध्ये लिहून दिलेले होते असे असले तरी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी देवगडे यांच्या कडून मार्च पर्यंतची १ करोड रुपयाची बिले तयार करून घेतली व त्या पैशाची उचल केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे गोठणगाव उपक्षेत्रातील रोपवनांच्या कामाची चौकशी चावडी वाचन किंव्हा लोकसुनावणी द्वारे जर केली तर खऱ्या अर्थाने सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकते.

Leave a Reply

Top