Home क्राईम स्टोरी क्राईम ब्लास्ट:- बल्लारपूरात पुन्हा ग्यांगवॉर शहरात भरदिवसा सूरज बहुरीया यांचा खून.

क्राईम ब्लास्ट:- बल्लारपूरात पुन्हा ग्यांगवॉर शहरात भरदिवसा सूरज बहुरीया यांचा खून.

 

वर्चस्वाच्या लढाईत अवैध धंद्यातून खून झाल्याची चर्चा, खुनी आरोपी अमन अंडेवार यांच्या स्टेटसवर ” जंगल जंगल ही रहेगा मगर शेर बदल जाएगा “चा अगाज तीन दिवसापूर्वीच.

बल्लारपूर प्रतिनिधी :-

मागील दोन महिन्यापूर्वी एका सुरक्षा एजन्सी च्या मालकाने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या असल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा युवक काँग्रेस चा तथाकथित सदस्य सूरज बहुरीया यांची भर दिवसा तब्बल तीन गोळ्या झाडून निर्घुन हत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे बल्लारपूर शहरात तणावाचे वातावरण असून अवैध कोळसा चोरी व अवैध दारू विक्रीतून मोठे झालेल्या दोन तस्करांच्या वर्चस्वाच्या लढाईत शेवटी अवैध दारू विक्री करणाऱ्या अमन अंडेवार गैंग ने अवैध कोळसा चोरीत लिप्त सूरज बहुरीया यांचा खून केल्याने बल्लारपूर शहर पुन्हा आपली जुनी ओळख निर्माण करतोय की काय अशी भीती बल्लारपूर शहरातील जनतेत निर्माण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे खून करणाऱ्या अमन अंडेवार यांचा आज वाढदिवस होता आणि त्यांनी तीन दिवसापूर्वी आपल्या व्हाट्सअप्प स्टेटस वर ” जंगल जंगल ही रहेगा मगर शेर बदल जाएगा” असा अगोदरच अगाज केला होता हे विशेष.

ग्यांगवॉर च्या या प्रकरणात वर्चस्वाची लढाई व एक दुसऱ्यांची दुष्मनी हेच या घटनेचे प्रमुख कारण असल्याचे बोलल्या जात आहे. खून करणाऱ्या अमन अण्डेवार यांचा आज वाढदिवस होता व म्रूतक सूरज बहुरीया यांचा उद्या वाढदिवस आहे. हे दोन्ही प्रतिस्पर्धी दरवर्षी वाढदिवसाला मोठे शक्ती प्रदर्शन करीत होते आणि वाढदिवसाला लाखो रुपयाची उधळण करायचे मात्र या वाढदिवसाला ग्रहण लागून एका गैंग चा अंत झाला तर दुसऱ्या गैंग ची कारागृहात रवानगी होईल त्यामुळे बल्लारपूर शहरात दोन्ही गैंग चा अस्त आता झाल्याचे बोलल्या जात आहे. अमन अंडेवार यांचासोबत त्याचा भाऊ चिन्ना अण्डेवार व इतर तीन ते चार इसम असल्याचे बोलल्या जात आहे तर सूरज बहुरीया यांच्या गाडीत मागच्या दोन शीट वर दोन ते तीन लोक असल्याची माहिती आहे तर अमन व चिन्ना या भावासह पुनः तीन ते चार व्यक्ती गोळ्या झाडताना सोबत होते असे बोलल्या जात असून सूरज बहुरीया हे गाडीत असतानाच त्यांच्यावर तब्बल तीन गोळ्या एका पाठोपाठ झाडल्याणे सूरज बहुरीया यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता ते गतप्राण झाल्याची माहिती आहे. पुढील तपास डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, स्वप्नील जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर करीत आहे.

Previous articleसैराट भ्रष्ट कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांची वनमंत्र्यांकडे धाव,
Next articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात पुन्हा 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद,एकाचा मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here