Home चंद्रपूर धक्कादायक :- संजय लेडांगेने पत्नीची हत्त्या करून प्रेत विहिरीत टाकले, मुलीच्या आईचा...

धक्कादायक :- संजय लेडांगेने पत्नीची हत्त्या करून प्रेत विहिरीत टाकले, मुलीच्या आईचा आरोप.

भद्रावती पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? जिल्हा  अधीक्षक यांच्याकडे केली कारवाईची मागणी.

चंद्रपूर :-

माझी मुलगी कुंदा संजय लेडांगे हिला दोन मुलीच असल्याच्या कारणावरून तिचे पती व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांनी व कुटुंबीयांनी संगनमत करून तिलाअगोदर ठार करून प्रेत  विहिरीत टाकल्याचा आरोप मुलीच्या आई सुलभा जिवतोडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

कुंदा संजय लेडांगे हीचा विवाह अंदाजे १० ते ११ वर्षापुर्वी टाकळी या गावातील संजय लेडांगे यांचे सोबत झाला. त्यांना लग्न संबंधातून दोन मुली आहे. परंतु २ ते ३ वर्ष चांगला संसार केल्या नंतर दुसरीही मुलगी झाल्याने माझ्या वैतागलेल्या माझ्या जावयाने अतोनात दारु पिणे सुरू केले व दारु पीऊन येवून ते नेहमी पत्नीला मारहान करीत होते. या संदर्भात मुलीने अनेक वेळा आई ला आपबीती सांगीतली परंतु कधी ना कधी जावई सुधारेल म्हणून पोलीस स्टेशनला मुलीच्या मारहानी संबंधाने तक्रार दाखल केली नव्हती. कारण आईला असे वाटत होते की, जर तक्रार दिली तर तिच्या मुलीचा संसार उध्वस्त होईल. पण आता माझ्या मुलीचा जीव लेडांगे परिवाराने घेतल्याने त्यांच्यावर हत्तेचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आई सुलभा जिवतोडे यांनी तक्रारीत केली आहे. व पत्रकार पत्रकार परिषद घेवून आई व बहीण यांनी कुंदा ला न्याय द्या असे आवाहन केले.

लेडांगे परीवाराने कुंदा हिला माहेरी घेऊन जाण्यास नेहमीच प्रवृत करत होते व माहेरच्या मंडळी समोर शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्रास जास्त झाल्याने मुलगी माहेरी येऊन राहत होती त्या नंतर जावई मुलीस घ्यायला येत होता. परंतु दोन मुलीच असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी माहेरूण पैसे आणण्याचा तगादा तो पत्नीला लावायचा व त्या कारणावरून नेहमीच मारहाण करत होता

२५ जानेवारी २०२० मुलीला जावयाने दारुपिऊन येवून अतोनात मारहान केली होती त्या मारहानीत मुलीचा दात तुटून पडला होता ही बाब माहीत झाल्यानंतर आईने हया मुलीस भेटीला गेली तेव्हा मुलीच्या पाठीला माराचे वर दिसून आले त्यामुळे दि. ३० जानेवारी २०२० ला माहेरी आणून तिला दवाखाना केला तेव्हा आई ने मुलीला रिपोर्ट देऊ म्हटले पण “तेव्हा तीने मी जर पती विरोधात रिपोर्ट दिली तर माझा सासरा अटयॉक येऊन मरुन जाईल. अशी ती म्हणाली होती म्हणून पती विरुद्ध रिपोर्ट दिली नाही, त्यानंतर मुलगी २ महिने माहेरी राहीली त्यानंतर पती व टाकळी येथील पोलीस पाटील हे चपराळा येथे दि. २३/३/२०२० ला मुलीच्या माहेरी आले घरचे समक्ष टाकळी येथील पोलीस पाटील यांनी ‘तुम्ही मुलीला पतिकडे यांचे कडे नांदायला पाठवा तुमच्या मुलीच्या केसाला धंक्का सुद्धा लागु देणार नाही याची हमी घेतो असे म्हटल्यावर आई ने पोलीस पाटील यांचे म्हणने नुसार मुलीला पती सोबत नांदायला पाठविले” तेव्हा पासून दोन तीन वेळा सुल्लक कारणावरून झगडा भांडन झाले होते.
दिनांक १७/०७/२०२० ला मौजा टाकळी येथे पती पत्नी यांचे सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान झगडा झाल्याची माहिती आहे त्यानंतर पती पत्नी शेतात गेले व पती आणि कुटुंबीयांनी संगनमत करून माझ्या मुलीला अगोदर मारून नंतर शेतातल्या विहीरीत ढकलून देऊन हत्त्या केली व आत्महत्या केल्याचा देखावा केला. कारण ज्याअर्थी माझी मुलगी आणि गैरअर्जदार जावई हे दोघेही मिळून शेतात गेले आणि सायंकाळला माझी मुलगी शेतातून परत आली नाही ती तूम्हच्या कडे आली का म्हणून गैरअर्जदार जावयाने आम्हाला फोन केला व तिचा जेंव्हा शोध घेण्यात आला तर गैरअर्जदार जावयाने सोबत असलेल्या लोकांना सरळ विहिरी जवळ घेवून गेले आणि महत्वाची बाब म्हणजे माझ्या मुलीला अगोदर मारण्यात येवून नंतर तिला विहिरीत टाकले असावे असे वाटते कारण जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यात पडतो तर तो खोलवर खाली जातो आणि ज्या विहिरीत तिला टाकण्यात आले तेंव्हा त्या विहिरीत पाणी बोरवेल मधून सोडण्यात आले होते याचा अर्थ सर्व गैरअर्जदार यानी एक योजना आखून माझ्या मुलीचा खून केला व आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याने वरील सर्व गैरअर्जदार यांच्यावर हत्त्या केल्याचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करून तुरुंगात टाकावे अशी मागणी मुलीची आई सुलभा जिवतोडे व बहीण छबू जिवतोडे हिने पत्रकार परिषद मधून पोलिस विभागाकडे केली आहे.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू, प्रगती पडगिलवार, वनिता कापसे उपस्थित होते ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here