Home गडचिरोली खळबळजनक : – कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी रस्त्यांचे कामे पूर्ण न...

खळबळजनक : – कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी रस्त्यांचे कामे पूर्ण न करता 75 टक्के निधी हडपला ?

चातगाव मधील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई मग सोनटक्के यांच्या बाबतीत ccf गप्प का ? सोनटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करून  निलंबनाची कारवाई करा अशी मागणी .

कुरखेडा प्रतिनिधी ;-

वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचारांच्या कहाण्याचा जणू एक अध्याय बनू शकतो एवढा मोठा आणि सशक्त भ्रष्टाचार त्यांनी केल्याचे आता उघड होत झाले आहे. सोनटक्के यांनी कुरखेडा येथील जांभूळखेडा गोठणगाव या उपक्षेत्रात विविध रस्त्यांचे कामे केली असल्याचे दाखवून त्या मुरूम रस्त्यांच्या कामामध्ये केवळ 25 टक्केच कामे करून जवळपास 75 टक्के निधीची परस्पर उचल केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकीकडे चातगाव मधील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाली असताना सोनटक्के यांच्या बाबतीत ccf गप्प का आहे ? हा गंभीर प्रश्न असून आता सोनटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाचीच कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्यावर जी चौकशी लागली त्या चौकशीचा अहवाल आला असून त्यात सोनटक्के यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा ठपका आहे, त्यामधे त्यांनी मुरूम रस्ता बांधकामात जवळपास 17 लाख रुपये हडपल्याचे सांगण्यात येत आहे, सोनटक्के यांनी शासनाची भ्रष्ट मार्गाने जी संपती मिळवली ती जप्त करून त्यांच्या विरोधात पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वतः वनविभागातील कर्मचारी अधिकारी यांची मागणी आहे

Previous articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात पुन्हा 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद,एकाचा मृत्यू.
Next articleधक्कादायक :- संजय लेडांगेने पत्नीची हत्त्या करून प्रेत विहिरीत टाकले, मुलीच्या आईचा आरोप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here