Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक व अवैध दारू बंद न केल्यास मनसे गावागावात...

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक व अवैध दारू बंद न केल्यास मनसे गावागावात पोळा भरवून आंदोलन करणार.

डेंजर झोन असलेल्या नागपूर वरून वेकोलि मुरपाड भूमिगत खदानित काम करणारे मजूर येत असताना त्यांच्यावर निर्बंध का नाही ? व नागपूर वरून चोरट्या मार्गाने अवैध दारू जिल्ह्यात येते त्यावर अंकुश का नाही ? असा मनसेचा सवाल ..

चंद्रपूर :-

देशात व राज्यात कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभाग तसेच शासन प्रशासनाच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय कार्यक्रम, सार्वजनिकरीत्या पार पाडणारे सण यावर निर्बंध घालून जिल्हात किंवा जिल्ह्याच्या बाहेर येण्या-जाण्यास परवानगीची अट आहे. सोबतच जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस विलगीकरण कक्षात ठेवून त्यावर शासनाच्या तिजोरीतून पैशे सुद्धा खर्च करण्याची तरतूद आहे, त्यामुळे सदर रोगाचे भायावह वास्तव लक्षात येतच आहे यात शंका नाही.

परंतु जिल्हाबंदी असतांना व सर्वत्र लॉकडावून असतांना जिल्ह्यात रोज- राजरोसपणे दारू माफिया पोलिसांच्या आडोशाने दारू जिल्ह्यात पुरवठा करीत आहे व , जिल्ह्यात पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे त्या प्रमाणात तळीरामांना दारू उपलब्ध होत आहे, त्यातच उमरेड क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मुरपार भूमिगत खदानीत अंदाचे 400 च्या जवळपास कामगार काम करित आहेत त्यापैकी 150 च्या जवळपास कामगार मुख्यालयात न राहता डेजर झोन नागपूर जिल्ह्यातील उमरेड या ठिकाणावरून रोज प्रवास करतात व येथील कामगार जिल्हाभर लोकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोना संक्रमण वाढण्याची भीती आहे या संदर्भातील वृत्त दैनदिन वृत्तपत्रात प्रकाशित होवून देखील प्रशासन कार्यवाही करीत नाही. अश्याप्रकारची लॉकडाऊनमधे विचित्र परिस्थिती बघावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्याच्या मनात कोविड-19 ची भीती दाखवून अधिकारी वर्ग हुकुमशाही, दडपशाही करून नेमकं काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

त्यामुळे एकाच जिल्ह्यात एकासाठी वेगळा आणि दुसऱ्यासाठी वेगळा कायदा असू शकतो काय ? असा प्रश्न या अर्थाने निर्माण होत आहे.

सदर प्रश्न गंभीर व महत्वाचे असताना प्रशासन महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपण्याचे काम पोळा सणाच्य माध्यमातून होत आहे तो सण च साजरा करू नये असे आदेश देतात तर मग गावातील शेतकऱ्यांना अगोदरच कोरोना झाला असे प्रशासनाला वाटते का ? की गावातील लोकानी कोरोना पसरवीला आहे ? महाराष्ट्राच्या संस्कॄती व परंपरेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच जपत आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोळा ह्या महत्वपूर्ण सणाला प्रशासनातर्फे जो पायबंद घातला गेला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही जर बाहेर जिल्ह्यातून अवैध वाहतूक व अवैध दारू सुरू आहे, त्यांच्यामुळे कोरोना पसरत नाही तर मग गाव खेड्यावर पोळा साजरा करण्याने खरच कोरोना पसरेल का ? असा सवाल करून जिल्ह्यात येणारी अवैध दारू आणि डेंजर झोन मधील प्रवाशी छुप्या मार्गाने येवून सुद्धा त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश नाही तर मग आम्हच्या शेतकऱ्यांना वर्षातून एकदा बैलाचा सन्मान व उत्सव साजरा करण्यास निर्बंध का ? असा सवाल मनसे तर्फे प्रशासनाला विचारला आहे व जिल्ह्यात अवैध वाहतूक व अवैध दारू हे तत्काळ बंद करा व दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्ह्याच्या प्रत्त्येक गावात पोळा सण साजरा करून अभिनव आंदोलन करू असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून व पत्रकार परिषद घेवून दिला आहे, व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाला भीक न घालता शासनाचे कोविड -19 चे नियम पाळून पोळा मोठ्या प्रमाणात साजरा करा त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी उभी आहे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, राजू कुकडे, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, डॉ. भरत, भयाजी कारेकार, मंगेश ठोंबरे, विवेक धोटे इत्यादींची इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here