Home कोरपणा भाजपा च्या वतीने कोरोना योध्दा चा सत्कार

भाजपा च्या वतीने कोरोना योध्दा चा सत्कार


प्रमोद गिरडकर कोरपना)
कोरपना येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ नियोजन व वने महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आशा वर्कर, पत्रकार, सफाई कामगार ,यांनी अतुलनीय कार्य केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले,
संपूर्ण देशात कोरोना या विष्णूचे थैमान घातले असताना लॉक डाऊन मध्ये आशा वर्कर, पत्रकार, सफाई कामगार जनतेच्या सेवेत कार्य सुरू होते, त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप महिला मोर्च्या च्या वतीने रक्षबांधनाचे औचित्य साधून सफाई कामगार व पत्रकार बांधवाना राखी बांधून त्यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, रमेश पा. मालेकर, नगरसेवक अमोल आसेकर,भारत चन्ने, पत्रकार अबरार अली, मेघराज हरबळे, विजय बोरडे, मनोज गोरे, अल्काताई रणदिवे,शोभा आगलावे, इंदिरा कोल्हे, व आशा वर्कर व सफाई कामगार उपस्थित होते,

Previous articleशासकीय आश्रमशाळा व्येंकटापुर येथे जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
Next articleचंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक व अवैध दारू बंद न केल्यास मनसे गावागावात पोळा भरवून आंदोलन करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here