Home चंद्रपूर धक्कादायक :- कॉरोनटांईन सेंटर मधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या राजेश बेलेचे घर मनपा...

धक्कादायक :- कॉरोनटांईन सेंटर मधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या राजेश बेलेचे घर मनपा प्रशासनाने पाडले ?

 

राजेश बेले कॉरोनटांईन सेंटरमधे असताना मनपा प्रशासनाचा घर तोडण्याचा प्रताप संशयास्पद,, शहरात अनेक बेकायदेशीर बांधकाम आहे ते तोडण्याची हिंमत मनपा प्रशासन का दाखवत नाही ? जनतेचा सवाल.

चंद्रपूर :-

शहरात अनेक धनदांडग्याचे मोक्याच्या जागी, आणि जाण्यायेण्याच्या रस्त्यावर देखील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम असताना त्यांच्या बांधकाम झालेल्या इमारती पाडण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवत नाही तर जे गरीब आहे ज्यांना कुठलेही राजकीय पाठबळ नाही किंव्हा ज्यानी मनपा प्रशासनाच्या भ्रष्टाचारांची पोल खोलली अशांना लक्ष करून मनपा प्रशासन सूडबुद्धीने कारवाई करते असाच एकूण आजपर्यंतचा इतिहास आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे सामजिक कार्यकर्ते हे मनपा प्रशासनाच्या देखरेखेखाली कॉरोनटांईन सेंटरमधे असताना त्यांच्या घराचे बांधकाम मनपा प्रशासन तातडीने तोडले कसे ? हा गंभीर प्रश्न असून मनपा प्रशासनाला अशी कुठली घाई झाली ? काय यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती की यामुळे मनपा प्रशासनाचे फार मोठे नुकसान होत होते? हे कळायला मार्ग नसून सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी कॉरोनटांईन सेंटरमधे निकृष्ट जेवण,असूविधा व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळेच सूडबुद्धीने त्यांच्या घरांचे बांधकाम तोडून मनपा प्रशासनाने आपला सूड उगारला असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मनपा प्रशासन आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी असल्या प्रकारची कारवाई करून जनतेत आपली प्रतिमा मलीन करीत असल्याचे दिसत आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here