Home वरोरा आनंदाची बातमी :- स्वच्छ सव्हेक्षण २०२० अंतर्गत वरोरा शहराचे राष्ट्रीय स्तरावर गुणांकन.

आनंदाची बातमी :- स्वच्छ सव्हेक्षण २०२० अंतर्गत वरोरा शहराचे राष्ट्रीय स्तरावर गुणांकन.

२० अॉगस्त २०२० रोजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी स्वीकारला पुरस्कार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहर हे पद्मश्री श्रधेय बाबा आमटे यांचा पावन वारसा लाभलेल शहर असून विद्यमान नगरपरिषद प्रशासनाने शहरातील स्वच्छता संबंधी विविध उपाययोजना केल्याने या शहराला व वरोरा नगर परिषद ला West Zone – fastest mover’ City या सेक्शन मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला.

काल दि.20 अॉगस्त रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदिपसिंग यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान यांचा मार्फत स्वच्छ सव्हेक्षण २०२० पूरस्काराचे वितरण ऑनलाईन सोहळाच्या मध्यमातुन करण्यात आले होते त्यामध्ये वरोरा नगर परिषदेला लाभलेला हा बहुमान हा नगरपरिषद मधील सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी व विशेष म्हणजे वरोरा शहराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, पूर्व मुख्याधिकारी-सुनील बल्लाळ, विद्यमान मुख्याधिकारी सूर्यभान पिजदुरकर नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल झोटिंग, बांधकाम सभापती छोटूभाई शेख, आरोग्य सभापती प्रदिप बुरान यांच्या परिश्रमाने मिळाला असल्याची प्रतिकृती उमटत आहे.

हा पुरस्कार नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी स्वीकारला असून त्यांनी या प्रसंगी वरोरा नगर परिषदेला मिळालेल्या या बहुमानाचे सर्वस्वी श्रेय वरोरा शहरातील जनतेला दिले.सोबतच या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० मध्ये सहकार्य करणारे सर्व न.प.सभापति,सदस्य,कर्मचारी,विशेष करून सफाई कामगार यांचे खुप खुप आभार व्यक्त केले…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here