Home चंद्रपूर दुःखद वार्ता/ब्रेकिंग न्यूज – कोरोनाशी लढताना एका डॉक्टर चा आज...

दुःखद वार्ता/ब्रेकिंग न्यूज – कोरोनाशी लढताना एका डॉक्टर चा आज चंद्रपूरात कोरोनाने मृत्यू.

 

कोरोना बाधितांवर उपचार करता करता डॉक्टर झाले होते पॉझिटिव्ह, आरोग्य प्रशासनामधे खळबळ,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना मुळे देशात आणि राज्यात थैमान घातले असून या कोरोना संक्रमण झालेल्या मधे चक्क डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर पाठोपाठ पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा आकडा सुद्धा तेवढाच मोठा आहे मात्र ज्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण सुरुवातीला नव्हता आज तिथे संख्या १३०६ वर पोहचली असून आतपर्यंत १२ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजुरा येथील ३२ वर्षीय निवासी जे स्वतः डॉक्टर होते ज्यानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयुश वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते जवळपास एक वर्षापासून कार्यरत असताना त्यांची सेवा कोविड -19 अंतर्गत चंद्रपूर येथे सुरू होती मात्र मागील दहा दिवसापूर्वी त्यांना कोरोना चा संसर्ग झाला आणि उपचार घेत असतानाच अचानक आज दिनांक 21/08/2020 ला दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यक डॉ. यांनी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती येथून पदवी घेतली होती विशेष म्हणजे सदर डॉ. हे कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे.ऐन उमेदीच्या काळात मृत्यू पावलेल्या डॉक्टर ला 2 वर्षाची छोटी मुलगी सुद्धा आहे. अर्थात त्यांच्या परिवारा वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here