Home चंद्रपूर चंद्रपूर मनपा प्रशासनाचा हा कसला अतिरेक ? ज्या गेडामचे अवैध बांधकाम तोडायचे...

चंद्रपूर मनपा प्रशासनाचा हा कसला अतिरेक ? ज्या गेडामचे अवैध बांधकाम तोडायचे आदेश त्याचेच सरक्षण ?

 

सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या अवैध ठरविलेले बांधकाम तोडण्याची घाई मग नरेंद्र गेडाम यांनी दोन मजली अवैध इमारत उभी केली ती का तोडत नाही ?

चंद्रपूर मनपा भ्रष्ट कारभार भाग -1

सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी कोरोनटाईन सेंटर वर होत असलेल्या भ्रष्टाचारा ची पोल खोल केल्याने भांबवलेल्या चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने त्यांच्या घराचे अवैध बांधकाम असल्याचे ठरवून ते लागलीच तोडले, जेंव्हा की त्यावेळी राजेश बेले हे स्वतः कोरोनटाईन सेंटरमधे कोरोनटाईन होते, महत्वाची बाब म्हणजे शहरात अनेक अवैध बांधकामे आहेत ते तोडण्यासाठी मनपा प्रशासन वर्ष दोन वर्ष झाली तरी तोडत नाही मग राजेश बेले यांचे अवैध ठरवलेले बांधकाम तोडण्यासाठी मनपा प्रशासनाला एवढी घाई का झाली ? हे कळायला मार्ग नसून पुन्हा मनपा चा एक भोंगळ कारभार असाच आश्चर्यचकित करणारा आहे, एकात्मिक आदिवासी विकास विभागात निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले नरेंद्र गेडाम यांनी एका खोब्रागडे आडनाव असलेल्या महिलेकडून नझुल ची जागा विकत घेतली, तशी ती विकत घेता येत नाही पण ईमला खरेदी केल्याचे नोटरी द्वारे दाखवले, यामधे नरेंद्र गेडाम यांनी एकाच जागेच्या व एकच किंमत असलेल्या दोन नोटऱ्या करून शासन प्रशासनाची दिशाभूल केली त्यात त्यांनी अगोदर खोब्रागडे यांच्या कडून 480 चौरस फूट जागा असल्याचे दाखवले व दुसऱ्या नोटरीत 840 चौरस फूट जागा असल्याचे दाखवले आणि दोन मजली इमारत बस स्थानक च्या मागे उभी केली. या इमारतीला मनपा ची बांधकाम परवानगी सुद्धा नाही त्यामुळे ही इमारत पाडणे मनपा प्रशासनाला आवश्यक असताना  नरेंद्र गेडाम यांनी इमारत उभी करताना शामराव गेडाम जे 40 वर्षापासून जिथे घर बांधून असून त्यांच्याकडे सर्व जागेची कागदपत्रे आहेत त्यांच्या जवळपास 350 चौरस फूट जागेवर सुद्धा अतिक्रमण केल्याने त्यांनी नरेंद्र गेडाम यांचे अवैध बांधकाम तोडण्यात यावे अशी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि स्थानिक तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या, त्या तक्रारी वरून 31 मार्च 2016 ला तहसीलदार यांनी आदेश करून नरेंद्र गेडाम यांचे अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले, मात्र महानगरपालिका प्रशासनाने मागील चार वर्षापासून नरेंद्र गेडाम यांचे अनधिकृत बांधकाम तोडले नाहीच उलट पुन्हा नरेंद्र गेडाम हे शामराव गेडाम च्या जागेवर आपला दावा दाखवून मनपा प्रशासनाला हाताशी धरून स्वतःच्या जागेत विटा ठेवणाऱ्या शामराव गेडाम यांच्या विटा फेकून देतात व अवैध व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नरेंद्र गेडाम यांची पाठराखण करतात त्यामुळे  मनपा प्रशासन हे चोरांना साथ देत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे  आता राजेश बेलेचे बांधकाम तोडण्याची घाई जर होत असेल तर नरेंद्र गेडाम हा मनपा चा जावई आहे का ? त्याचे पण बांधकाम तोंडा, पण असे मनपा प्रशासन करणार नाही कारण त्यांना लाचार कमजोर आणि विरोधी लोकांनाच लक्ष करायचे आहे आणि ते करणार आहे पण आता मनपा प्रशासनाद्वारे अवैध बांधकाम करणाऱ्यांची पाठराखण ही जनतेसमोर यावी याकरिता भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरू झाली असून वाचकांनी जनतेवर मनपाद्वारे होणाऱ्या अन्यायाची माहिती द्यावी असे आव्हान संपादक यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here