Home चंद्रपूर संतापजनक :- घूग्गूस पोलिस स्टेशनचे सचिन बोरकर व विनोद वानकर यांचे दारू...

संतापजनक :- घूग्गूस पोलिस स्टेशनचे सचिन बोरकर व विनोद वानकर यांचे दारू माफियांसोबत अर्थपूर्ण सबंध ?

 

माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर यांनी पोलिस कर्मचारी सचिन बोरकर यांच्यासह दारू माफिया स्वप्नील ठाकरे यांची केली होती पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार.

घूग्गूस प्रतिनिधी :-

बदली होऊनही सचिन बोरकर व विनोद वानकर या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली का रोखली ? याबाबत घूग्गूस पोलिस प्रशासनात चर्चेला उधाण आले असताना आता तर सचिन बोरकर यांचे कुख्यात दारू तस्कर स्वप्नील ठाकरे यांच्यासोबत अर्थपूर्ण सबंध असल्याची चर्चा असल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून ह्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बदली झाल्यानंतर सुद्धा विनंती अर्जावर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे कायम ठेवण्याचा काय प्रकार आहे ? हे कुणालाच कळले नाही.

दारू तस्कर राजेश मोरपक्का यांच्या वाढदिवशी ह्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांपैकी सचिन बोरकर यांची केक भरवताना उपस्थिती बघून हे पोलिस दारू तस्कर यांच्यासोबत अवैध दारू तस्करीत सहभागी असल्याचे दिसत आहे. या संदर्भात घूग्गूसचे माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर यांनी दारू तस्कर स्वप्नील ठाकरे व पोलिस कर्मचारी यांच्या संयुक्त अवैध दारू वाहतुकीसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, त्यामुळे सचिन बोरकर व विनोद वानकर ह्या दोघांची घूग्गूस येथील दारू तस्कर यांच्यासोबत असलेली अभद्र युती असल्याचे स्पष्ट होत आहे आणि त्यांच्या त्या आपसातील अर्थपूर्ण समझोता हाच वणी तालुक्यातून व्हाया घूग्गूस शहरातून मोठ्या प्रमाणात दारू साठा हा चंद्रपूर शहरात व परिसरात जात असल्याची माहिती आहे, अर्थातच सचिन बोरकर व विनोद वानकर यांची दारू तस्कर यांच्यासोबत असलेली जवळीक व त्यामुळे पोलिस विभागाचे बदनाम होत असलेले नाव याची दखल घेवून त्यांची रद्द झालेली बदली यावर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने पुनर्विचार करावा अशी मागणी घूग्गूस मधील नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here