Home चंद्रपूर धक्कादायक :- गोकुल प्लाझा अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर सुद्धा कंचर्लावार यांनी केले अवैध...

धक्कादायक :- गोकुल प्लाझा अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर सुद्धा कंचर्लावार यांनी केले अवैध बांधकाम,

 

पार्किंगच्या जागेवर दुकाने बांधून विकले. ओम भवन परिसरातील असलेल्या गोकुल प्लाझाच्या अनधिकृत बांधकामाला मंजूरी कुणाची ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १४

चंद्रपूर महानगर पालिकेत आता महापौर कंचर्लावार व त्यांच्या नातेवाईकांची एकतर्फी सत्ता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना वाकूल्या दाखवत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. कारण चक्क माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी कंचर्लावार यांच्या अवैध अतिक्रमण व बांधकाम या संदर्भात चंद्रपूर मनपा आयुक्त यांना दिलेली तक्रार सुद्धा कंचर्लावार यांच्या सत्तेपुढे कमकुवत ठरली तिथे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची काय अवस्था असेल ? हे अधिक चिंतनीय बाब आहे. शहरातील एकापाठोपाठ एक नवनवे अवैध बांधकाम कंचर्लावार परिवारांच्या सदस्यांकडून बांधल्या गेले त्याची माहिती समोर येत असल्याने एकीकडे शहरातील जनतेत आक्रोश व्यक्त होत असताना सत्ताधारी भाजप नगरसेवक व पदाधिकारी नेमके कुठल्या मानसिकतेत आहे ? हा प्रश्न गंभीर बनला असून भाजपचे नेते यांची सुद्धा याबाबत जाहीर प्रतिक्रिया समोर आली नसल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात नेमके चालले तरी काय ? याबाबत शहरातील जनतेत उत्सुकता आहे.

कंचर्लावार बंधूंच्या शहरातील सर्व इमारती यांची गोळाबेरीज केली तर तब्बल ७५ टक्के पेक्षा जास्त इमारतीचे बांधकाम हे मंजूर नकाशा नुसार नसून यामधे मनपाच्या नगररचना व बांधकाम विभागा सोबतच आयुक्त यांच्या पाठबळामुळेच हे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याची बाब उघड होत असतानाच आता शहरातील नागपूर रोड जवळील ओम भवन परिसरातील गोकुल प्लाझा ही वाणिज्य वापरासाठीची इमारत बेकायदेशीर असल्याचे उघड होत आहे. कारण या इमारतीच्या पार्किंगच्या जागेवरच दुकाने बांधून ते विकण्यात आल्याने चक्क त्या इमारतीत गाळे घेतलेल्या मालकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे, कारण या इमारतीत पार्किंगची जागा नसल्याने ओम भवन परिसरात गाड्या अस्ताव्यस्त दिसतात, काही व्यक्तीने तर असे सुद्धा सांगितले की ह्या इमारतीलाच मंजुरी नाही, मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कंचर्लावार परिवाराने बेकायदेशीर बांधकामाला कायदेशीर बनविण्याचा खेळ केला नसेल हे कशावरून ? आता ह्या बेकायदेशीर इमारती बांधकामाला मंजुरी देणाऱ्या त्या नगररचना व बांधकाम विभागाला आपले म्हणणे सुद्धा जाहीर करण्याची मुभा नसल्याने चंद्रपूर मनपा मधे चाललेली तानाशाही कोण संपविणार ? याबाबत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस किंव्हा बसपा आवाज उठविणार की आंधळे बहीरे व मुक्याचे सोंग घेणार ? हे येणाऱ्या दिवसांत समोर येणार आहे.

Previous articleक्राईम ब्लास्ट:- माजरी वेकोलि क्षेत्रात अजय यादवचा खून, एका आरोपीला अटक तर तीन आरोपी फरार.
Next articleआक्रोश :- विष्णू कष्टी यांची हत्त्या करणारा शंभू चौधरी पोलिसांच्या आशीर्वादाने अजूनही मोकाट?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here