Home वरोरा आक्रोश :- विष्णू कष्टी यांची हत्त्या करणारा शंभू चौधरी पोलिसांच्या आशीर्वादाने अजूनही...

आक्रोश :- विष्णू कष्टी यांची हत्त्या करणारा शंभू चौधरी पोलिसांच्या आशीर्वादाने अजूनही मोकाट?

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शंभू चौधरी यांना अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तरीही पोलिस थंड का ?

वरोरा प्रतिनिधी :-

खरं तर पोलिसांवर विश्वास ठेवायचा का नाही ? या संभ्रमात सगळी जनता आहे, कारण शहरात खुलेआम अवैध दारू विकल्या जाते आणि त्याबद्दल प्रसारमाध्यमांमधे बातमी येते मग ही खबर पोलिसांना का नसते ?कोळसा चोरी, भंगार चोरी, डिझेल चोरी होते ती बातमी प्रसारमाध्यमांमधे आल्यानंतर एवढेच नव्हे तर त्याबद्दल तक्रार दिल्यानंतर पण पोलिस त्यांवर थंड का असते, एखाद्याचा खून होते तर आरोपी हे पोलिस पकडत नाही तर लोक पकडतात व पोलिसांना फोन करतात तरीही पोलिस दोन तास उशिरा येते? यावरून पोलिसांच्या ” *सदरक्षणाय, खलनिग्रहनाय”* या पोलिस ब्रीदाला हड़ताळ पाडण्याचे काम स्वतः पोलिस करीत नाही का ? आणि हे जर होत आहे तर यापेक्षा पोलिस वर्दीचे दूर्भाग्य ते कुठले ? पण हो हे सत्य आहे. वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत ज्या खांबाडा परिसरात विष्णू कष्टी नावाच्या एका जवान मुलाचा खून कुख्यात स्फोटक तस्कर शंभू चौधरी आपल्या कामावर असलेल्या माणसा कडून करतो पण अगोदरच पोलिसांना हप्ता देणारा व त्यांना आपल्या वाड्यावर पार्ट्या देणारा शंभू जणू निरपराध आहे अशी व्यवस्था पोलिसा कडून करून बिनधास्तपणे तो आपल्या निवासस्थानी राहतो म्हणजे पोलिसांना नेमके या खुनाचे रहस्य लपवायचे आहे का ? पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुख्यात स्फोटक तस्कर म्हणून ओळखला जाणारा शंभू चौधरी अजूनही तपासात गुन्हेगार नाही ? मग शंभू ला त्याच्या गोडाऊन मधील स्फोटक पदार्थ लपविण्यासाठी संधी दिल्या जात आहे का ? हेच कळत नाही.खरतर विष्णू कष्टी याचा खून शंभू चौधरी यांनीच केला याबाबत सर्व गाव बोलायला तयार असताना पोलिस त्या हत्त्या करणाऱ्या शंभू ला वेळ देतोय कशासाठी ? हेच कळत नाही,

पोलिस जाणीवपूर्वक शंभू चौधरी याला आपले सगळे काळे धंदे लपवीण्यासाठी वेळ देत आहे कारण पोलिसांना सुद्धा माहीत आहे की मुख्य आरोपी हा शंभूच आहे पण दिलेल्या अन्नाला जागण्याची पोलिसांची भूमिका जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरू नये, याचे कारण असे आहे की जर शंभू ला चांगला धुतला तर आत्ताच तो पोपटासारखा बोलायला लागेल पण पोलिस त्याला मारण्याच्या स्थितीत नाही तर त्याला इथून तारन्याच्या स्थितीत आहे आणि याचा उद्रेक पोलिसांच्या पथ्यावर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहे. आता या संदर्भात खांबाडा गावातील लोकांनी कायदा हातात घेऊन जर शंभूचा तंबू उखडला तर याची जबाबदारी ही निश्चितच पोलिसांची असेल कारण एका खुनाचा आरोपी शोधण्यासाठी पोलिसांचा नेहमीच ससेमिरा होतो पण मोठ्या प्रयत्नाने आरोपी सापडतो पण मग इथे तर चक्क आरोपी समोर दिसत असताना पोलिस नेमका कशाचा तपास करताहेत? हेच कळायला मार्ग नाही. पोलिस हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा खांबाडा गाव व परिसरात असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन हे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिल्यानंतर सुद्धा मुख्य आरोपी शंभू ला पकडण्यात पोलिस उशीर करीत आहे त्यामुळे मनसे तर्फे गावातील सर्व गावकऱ्यांना घेवून आंदोलन करण्याची तयारी असल्याने येणाऱ्या काळात खरच स्थानिक मराठी माणसाचा खून करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरीला धडा शिकवल्या जाईल का ? याचे उत्तर मिळणार ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here