Home चंद्रपूर दे धक्का :- आता मनपा सहाय्यक आयुक्त शितल वाकडे दत्तू कंचर्लावार यांचे...

दे धक्का :- आता मनपा सहाय्यक आयुक्त शितल वाकडे दत्तू कंचर्लावार यांचे अतिक्रमण व बांधकाम तोडणार का ?

 

राजेश बेले यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्याकडे केली तक्रार पण प्रशासनाचे झोपेचे सोंग ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग- १७

चंद्रपूर महानगर पालिकेत स्वच्छ व पारदर्शी प्रशासन व येथील जनतेला चांगल्या सुख सुविधा देवू असे म्हणून सत्तेत आलेली भाजप आता नेमकी महानगर पालिका प्रशासनाला कुठे नेऊन ठेवत आहे ? हेच कळत नसून एकीकडे महापौर यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम मंजूर नकाशा प्रमाणे नाही अर्थात अवैध आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्या पतीचे अवैध अपार्टमेंट व त्यांच्या नातेवाईकांचा मोक्याच्या मनपा जागेवर कब्जा आणि दुसरीकडे भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा बेकायदेशीर असल्याचे समोर आल्याने ह्या भाजपवाल्यांना यासाठीच चंद्रपूर शहरातील जनतेने निवडून दिले का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट सराई मार्केट मधील मनपाच्या जागेवर महापौर यांचे जवळचे नातेवाईक दत्तू कंचर्लावार यांनी आपल्या जनार्धन मेडिकल चा विस्तार करून मागील जवळपास ५०० चौरस वर्ग फूट जागेवर अतिक्रमण करून तात्पुरते टीना चे बांधकाम केले, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार देवून ते बांधकाम पाडण्याची मागणी केली होती पण जवळपास आठवडा लोटत असताना मनपा प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही, तर उलट झोपेचे सोंग घेऊन कुठल्या दरीत लपलेले आहे ? हेच कळायला मार्ग नाही,विशेष म्हणजे सहाय्यक आयुक्त शितल वाकडे यांनी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले हे कोविड सेंटर येथे कोरोनटाइन असताना त्यांच्या गैरहजरीत त्यांच्या घराचे बांधकाम पाडले तर मग मनपा च्या जागेवर दत्तू कंचर्लावार यांनी केलेले अतिक्रमण व बांधकाम मनपा सहाय्यक आयुक्त शितल वाकडे का तोडत नाही ? इकडे सामाजिक कार्यकर्ते मनपा प्रशासनाच्या कोविड सेंटर मधील भोंगळ कारभाराविरोधात आवाज उचलतात म्हणून त्यांचे घराचे बांधकाम तोडण्याची उर्मी सहाय्यक आयुक्त शितल वाकडे यांच्यात निर्माण होते तर मग आता मनपाच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम करणाऱ्या महापौर यांच्या नातेवाईक दत्तू कंचर्लावार यांचे बांधकाम तोडण्याची हिंमत त्या का दाखवत नाही ? काय इथे त्या नतमस्तक झाल्या की त्यांचा पॉवर काम करीत नाही ? हे पण चंद्रपूर शहरातील जनतेला कळायला हवे की मनपा प्रशासन फक्त त्याच व्यक्तीचे बांधकाम तोडेल जे सत्तेत नाही व जे पैसे देवून अधिकाऱ्यांना खुश करणार नाही, आता भाजप नेते तथा माजी पालकमंत्री हे सद्ध्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना या गंभीर प्रकाराबद्दल कदाचित ?माहिती नसावी पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो सहरवाशीयांच्या आशा अपेक्षेवर ते मनपाच्या भ्रष्ट कारभारावर लक्ष ठेवत नसल्याने विरजण पडले आहे एवढे मात्र नक्की …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here