Home वरोरा धक्कादायक :- दारू तस्कर शकील उर्फ विशाल नागभिडकरची पत्रकारांना खुली धमकी व...

धक्कादायक :- दारू तस्कर शकील उर्फ विशाल नागभिडकरची पत्रकारांना खुली धमकी व पोलिसांना आव्हान ?

 

वरोरा बाजार समिती कार्यालयासमोर खुलेआम दारू विकणाऱ्या शकीलला पोलिसांचा आशीर्वाद तर नाही ना ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहर ही शांत आणि सामजिक भान राखणारी नगरी म्हणून प्रशिद्ध असली तरी जेव्हापासून दारूबंदी झाली तेव्हापासून गुंड, बदमाश आणि चोरी करणाऱ्यांचा शिरकाव अवैध दारू विक्री व्यवसायात झाल्याने व पोलिसांच्या हप्ताखोरीमुळे पुन्हा त्यांना एक प्रकारचे बळ मिळत आहे अर्थात त्यांची दादागिरी पुन्हा वाढली आहे. अशातच स्वतःला डॉन म्हणून घेणाऱ्या शकील उर्फ विशाल नागभिडकर हा गुंड प्रव्रुत्तीचा इसम आपली दादागिरी दाखवून वरोरा येथील क्रुषि उत्पन्न बाजार समिती समोर व नवीन नगरपरिषद समोर स्वतः व आपल्या एका व्यक्तीला ठेवून देशी विदेशी दारू खुलेआम विकत आहे, दरम्यान पत्रकाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांना मी हप्ता देतो, पाच वर्षापासून धंदा करतो आणि माझें कोणी काही बिघडवत नाही असे म्हणून पत्रकारांना जीवे मारण्याच्या हा धमक्या देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून एवढी मस्ती या अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाकडे येते कुठून ? हा खरा प्रश्न आहे. ज्या पोलीस प्रशासनाचा धाक अशा गुंडावर असायला हवा तिथे हा गुंड पोलिसांच्या अस्तित्वालाच आव्हान करतो म्हणजे पोलीस प्रशासन नेमके आहे तरी कशाला ? का बिमोड होत नाही अशा दारू तस्कर गुंडांचा ? महत्वाची बाब म्हणजे हे गुंड केवळ अवैध दारूच विकत नाही तर सामजिक आरोग्य सुद्धा बिघडवत असतात त्यामुळे अशा गुंडांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर तो स्वतःच्या अवैध दारू व्यवसायातून एखाद्यावर हल्ला करू शकतो आणि मग पोलीस प्रशासनाकडे आम्ही कठोर कारवाई करतो म्हणून केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीही राहणार नाही, त्यामुळे अशा गुंडांच्या अवैध दारू व्यवसायांवर त्वरित अंकुश लावण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Previous articleदे धक्का :- आता मनपा सहाय्यक आयुक्त शितल वाकडे दत्तू कंचर्लावार यांचे अतिक्रमण व बांधकाम तोडणार का ?
Next articleचिंताजनक :- कोरोना संकटात आरोग्य सोई- सुविधा संदर्भात राजकीय संभ्रम का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here