Home वरोरा सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे शेंगा नसलेल्या सोयाबीन झाडे देवून केला...

सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे शेंगा नसलेल्या सोयाबीन झाडे देवून केला सत्कार ,

 

वरोरा तालुक्यात बोगस सोयाबीन बियाणे विकणाऱ्या क्रुषि केंद्र संचालकबियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

वरोरा प्रतिनिधी( किशोर डुकरे)

तालुक्यात सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनची झाडे तेवढी वाढली पण सोयाबीन च्या झाडांना शेंगांच लागल्या नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात शेंगा लागल्याच नसलेल्या सोयायाबीचे झाड देऊन अभिनव आंदोलन आसाळा येथील शेतकऱ्यांनी आज केले.

आसाळा येथील प्रहार सेवक व माजी प्रहार शेतकरी विभाग तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजू आसुटकर, माजी पुलिस पाटील वासुदेव मडावी, तंटा मुक्ती अध्यक्ष शालिक डुकरे, सतीश गायकवाड, माणिक डुकरे, जगदीश गाढवे, प्रहार सेवक धर्मदास डुकरे, निलेश डुकरे, हनुमान पिपळशेंडे इत्यादी उपस्थित होते. सोयाबीनची तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यास शेंगा नसल्याचे सोयाबीन झाडे देवून माजी प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती सोयाबीन देऊन सत्कार केला यावेळी, टेमुर्डा येतील तलाठी गणेश कैरती, ग्रामसेवक राजेश राठोड, कृषी सहायक भुते साहेब तसेच कोतवाल राजू चांदेकर व इतरांची उपस्थिती होती …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here