Home चंद्रपूर पोलिस डायरी :- एलसीबीने पकडली राजू अन्नाची पडोलीत दारू, मग पडोली पोलिसांनी...

पोलिस डायरी :- एलसीबीने पकडली राजू अन्नाची पडोलीत दारू, मग पडोली पोलिसांनी त्याला का सोडले ?

 

सचिन यादव या पोलिस अधिकाऱ्यांची राजू अन्नाला पकडण्याची वारी झाली फेल ? जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेण्याची गरज.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पडोली पोलिस स्टेशन मधे जेव्हांपासून मुरलीधर कसार हे ठाणेदार म्हणून आले तेव्हापासून त्यांची दारू तस्करी करणाऱ्यासोबत सुरू झालेली अभद्र आघाडी यामुळेच राजू अन्ना सारख्या दारू तस्करी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नाही. मोठ्या शिताफीने एलसीबी पथकाने एमएच 49 बी 8550 डस्टर वाहनातून 72 पेटी अवैध देशी दारू साठा काही दिवसापूर्वी पकडला होता व ते प्रकरण पडोली पोलिसांकडे सुपूर्द केले होते, या प्रकरणात आरोपींनी आम्ही दारू राजू अन्ना कडून दारू आणल्याची कबुली दिल्यानंतर सुद्धा पडोली पोलिसांनी त्याचे वर गुन्हे दाखल केले नसल्याने राजू अन्ना सोबत पडोली पोलिसांची साठगांठ असल्याचे शिद्ध होत आहे. एवढेच नव्हे तर i 20 या वाहनातून पवन पुरेली नावाच्या कमल स्पोर्टिंग क्लब च्या घूग्गूस अध्यक्ष यांनी दारू तस्करी करताना पडोली पोलिसांनी दारूसाठा पकडला तेंव्हा पण राजू अन्ना यांच्याकडून दारू आणल्याचे कबुली दिल्यानंतर सुद्धा राजू अन्नाला पडोली पोलिस अटक का करीत नाही ? याचे आश्चर्य वाटते, एकीकडे त्रिमूर्ति धाब्यावर अवैध दारू विक्री ची खुली सूट दिल्यानंतर आता राजू अन्नाला सुद्धा दारू पुरवठा करण्याची खुली सूट पडोली पोलिसांनी दिल्याने ठाणेदार कासार यांच्यावरच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

दारू तस्करी करणाऱ्या चार युवकांना एलसीबी पथकाने पड़ोली पोलीस स्टेशन हद्दीत अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व डस्टर वाहन एमएच 49 बी 8550 व त्यातील 72 पेटी अवैध देशी दारू जप्त केली होती. दरम्यान ही दारू नेमकी कुठून आली ? व कुणाकडून आली याबद्दल सरफुद्दीन सैय्यद, अमित कुंभारे, दीपक वर्मा, विक्की जंगम या आरोपींना पोलिसांनी विचारले असता त्यांनी ही दारू राजू अन्ना कडून आम्ही आणल्याचे सांगितले त्यामुळे उपपोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी राजू अन्नाकडे गेले परंतु ते त्या राजू अन्नाला अटक करू शकले नाही कारण ठाणेदार कासार यांनी त्यांना अटक करू नका असा आदेश दिल्याची चर्चेतून माहिती समोर आल्याने राजू अन्ना ह्या दारू तस्कराला खुली सूट दिल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here