Home वरोरा आश्चर्यच :- वरोरा नगरपरिषदच्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांची ताडोबा सफारी कुणाच्या पैशावर ?

आश्चर्यच :- वरोरा नगरपरिषदच्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांची ताडोबा सफारी कुणाच्या पैशावर ?

 

सवेंदना हरपलेल्या त्या नगरसेवकांचे वरोरा येथील जनता करणार जंगी स्वागत?

वरोरा प्रतिनिधी :-

“भाड मे जाये जनता अपना काम बनता” जणू याच इराद्याने लोकप्रतिनिधी वागत असल्याने निवडणुकीत जनता अशा थोतांडाना कसे काय निवडून देतात असा प्रश्न आता सूज्ञ नागरिकांना पडायला लागला आहे. कारण एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने वरोरा तालुक्यात रुग्ण वाढत असून रोज 400 रुग्णांची भर जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदचे आवाहन केले असून दिनांक 25 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत कुणीही घराबाहेर विनाकारण पडू नये असे सुचविले असताना वरोरा नगरपरिषदचे नगरसेवक आपल्या व्यक्तिगत आनंद लुटण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी निघतात म्हणजे जनतेने यांना यासाठी निवडून दिले का ? असा प्रश्न पडत आहे. सद्ध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेने महाराष्ट्रात अभियान चालत आहे म्हणून नगरसेवक आपल्या कुटुंबीयांना घेवून सहलीला निघाले असेल का ? असाही प्रश्न या अर्थाने निर्माण होत आहे.परंतु असे असेल तर वार्डातिल नागरिकांच्या आरोग्य विषयक व इतर समस्या कोण सोडविणार ? वरोरा शहरात व माढेळी गावात व्यापाराने स्वतःहून दुकाने बंद केले आहे, व प्रशासन या काळात फिजिकल डिस्टंसिंग पाळण्याचा सल्ला सर्वांना देत आहे, मात्र दुसरीकडे वरोरा येथील सत्ताधारी काही नगरसेवक या कालावधीत सत्तेचा आनंद लुटण्यासाठी ताडोबा सफारीला सहकुटुंब गेले आहेत. अर्थात नगरसेवक यांना कोविड निवारण केंद्रासाठी वार्डातील अध्यक्ष पद जिल्हा अधिकाऱ्यांनी दिल्याने ती जबाबदारी ते झटकत असल्याचे दिसत आहे.

नगरसेवक यांच्या मौजमजा व आनंद लुटण्यासाठी रजा टूर अँड ट्रॅव्हल्स नावाच्या ट्रॅव्हल्स क्र. MH10K9574 ने वरोऱ्यातील हे नगरसेवक कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता तीस ते पस्तीस जणांचा सहकुटुंब ताफा घेऊन चिमूर येथील टायगर रिसोड येथे आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती असून काल सकाळी या नगरसेवकांची कोलारा गेट वरून रॉयल सफारी होणार झाली आहे. या ट्रॅव्हल्स मध्ये लहान मुलापासून ते वयोवृद्ध महिलांचा समावेश आहे. हा सगळा खर्च विशेष निधीतून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. ही सहल कुणाच्या पैशावर झाली हा प्रश्न असला तरी हा सगळा खर्च  हायकमांड यांनी मॅनेज करून दिल्याची चर्चा आहे, दरम्यान  नगर भवन जवळ ट्रॅव्हल्स बिघडली त्यामुळे अगोदरच उशीर झाल्याने मौजेत विरजण पडले. कशीबशी गाडी सुरू झाली. त्यानंतर या ट्रॅव्हल्स ला शेगाव पोलिसांनी थांबवले इथे कसून चौकशी झाल्यानंतर नगरसेवकांना वरिष्ठांची मनधरणी करावी लागली. पोलिसांनीही थातूरमातूर कारवाई करून वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या फोन आल्याने गाडी सोडली व ही वारी चिमूर येथील कोलारा गेट जवळील रिसॉर्ट मध्ये जाऊन पोहोचली आणि आपण कोविडच्या तणावातून मुक्त झाल्याचा आनंद हे सगळेजण याठिकाणी घेत आहे पण इकडे आता वरोरा शहरातील जनता या नगरसेवकांची आतुरतेने वाट बघत असून ती ट्रव्हेल मधेच थांबून जर नगरसेवक स्वतःच्या गाड्या बोलवून रफू चक्कर झाले नाही तर वरोरा येथे त्या नगरसेवकांचे जंगी स्वागत होईल एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here