Home वरोरा धक्कादायक :- परप्रांतीय राजस्थानी शंभू चौधरी हाच माझ्या पतीचा हत्त्यारा, मयत विष्णू...

धक्कादायक :- परप्रांतीय राजस्थानी शंभू चौधरी हाच माझ्या पतीचा हत्त्यारा, मयत विष्णू कष्टीच्या पत्नीचे पोलिसांकडे बयान.

 

संपूर्ण मोका चौकशीकरणाऱ्या वरोरा पोलिसांना अजून कुठले पुरावे हवे? घटनास्थळी मिळाला जूता पण पोलिसांना खबर नाही.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा पोलिसांवर राजकीय दबाव आहे की आरोपी शंभू चौधरीचे आर्थिक सुरक्षा कवच त्यांना कारवाई करण्यापासून थांबवीत आहे हेच कळायला मार्ग नसून ज्याअर्थी शंभू चौधरी यांनीच माझ्या पती विष्णू कष्टी ची हत्त्या केली असे संपूर्ण बयान तारखेसह तपास करणाऱ्या पोलिसांना मयत विष्णू कष्टीच्या पत्नीने दिल्यानंतर सुद्धा वरोरा पोलिस आणखी कुठल्या पुराव्यांची वाट बघत आहे ? हा गंभीर प्रश्न वरोरा पोलिसांच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

खरं तर जे आरोपी राजु अनिल कटवते रा वाघसावली, तहसील हिंगणघाट, राजकुमार शंभुलाल टेकाम रा पिपळगाव ह्यांची विष्णू कष्टी यांच्यासोबत कुठलीही दुष्मनी नव्हती सोबतच त्यांची दोघांची ताकत मिळून जरी अंदाज लावला तरी विष्णू कष्टीचा खून करेल अशी शक्यता वाटत नाही, मात्र ते आरोपी शंभु चौधरी यांच्याकडे नौकर होते आणि शंभू चौधरी यांनीच त्याच्या बंड्यावर विष्णू कष्टीचा खून करून त्याची लाश त्याच रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात टाकली व दोन आरोपींना विष्णू कष्टी ची गाडी देवून फरार होण्यास सांगितले असल्याची चर्चा खांबाडा गावात आहे.विशेष म्हणजे विष्णू कष्टी ला आपण ज्या ठिकाणी जीवे मारले असे आरोपी सांगताहेत त्या ठिकाणावर असे कुठलेही चिन्ह किंव्हा पडसाद दिसत नाही आणि ज्या झुडपात लाश टाकण्यात आली तिथे एक जूता सापडला असताना सुद्धा पोलिसांनी तो जूता जप्त केला नाही, त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण मैनेज केले असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने गावातील लोकांची मागणी आहे की शंभू चौधरी याला अटक करून त्याचा पीसीआर घ्यावा तेंव्हाच शंभू चौधरी आपला गुन्हा कबूल करेल. पण इकडे पोलिसांनी अगोदरच शंभू चौधरी याला वाचविण्यासाठी रणनीती आखली असल्याने पोलीस केवळ वरवर तपास करून ह्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आता नवीन पोलिस अधीक्षक यांच्याकडे हे प्रकरण दाखल होणार असल्याने शंभू चौधरी याला वाचवीण्याचा प्रयत्न जो चालविला जात आहे त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई होऊ शकते एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here