Home चंद्रपूर सनसनिखेज:- पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दारू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आखली रणनीती...

सनसनिखेज:- पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दारू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आखली रणनीती ?

 

जिल्ह्यात चार भरारी पोलिस पथक तयार करून दारू माफियांची होणार धरपकड ? आजपासून झाली सुरुवात.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पदभार सांभाळल्या नंतर लगेच पोलिस प्रशासनात स्फूर्ती आणण्यासाठी व जिल्ह्यात वाढत असलेले खून व अवैध दारू व्यवसाय यांवर आवर घालण्यासाठी चार सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या नेत्रुत्वात चार भरारी पोलीस पथक तयार केले असून आजपासूनच हे चार पथक आपल्या कामगिरीवर निघाले असल्याची चर्चा आहे.

नवे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे भंडारा येथे कार्यरत होते, त्यांनी त्यापूर्वी अमरावती ग्रामीण चे उपपोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक व नवी मुंबई येथे वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून यशस्वी पदभार सांभाळला होता. आता चंद्रपूर येथे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील भौगोलिक, राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपली स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे व चार भरारी पोलिस पथकांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अवैध दारू तस्करी व कोयला चोरीवर अंकुश लावण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांची स्थानिक दारू माफिया सोबत असलेली साठगांठ यांवर पायबंद घालण्यासाठी छोट्या मोठ्या कुठल्याही दारू तस्करांना सोडू नका सर्वावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवून जिल्ह्यातील दारू तस्करी करणाऱ्यावर आसूड ओढण्याचे कामाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here