Home वरोरा वरोरा नगरपरिषदच्या त्या नगरसेवकांचा मनसेने बेशरमचे फुल देवून व दिवे लावून केला...

वरोरा नगरपरिषदच्या त्या नगरसेवकांचा मनसेने बेशरमचे फुल देवून व दिवे लावून केला प्रतीकात्मक सत्कार !

 

नगरपरिषद मधून गायब असलेल्या नगरसेवक यांच्या नावाचे नगराध्यक्ष यांना दिले निवेदन, मनसेच्या या आगळ्या आंदोलनाची शहरात चर्चा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना व शहरातील प्रत्येक वार्डाचे कोविड निवारण केंद्राचे अध्यक्ष पद नगरसेवकांना बहाल केले असताना जर स्वतः नगरसेवकच आपली जबाबदारी पार न पाडता कोरोना च्या या संकट काळात सहलीला जात असेल तर मग यांना शहरातील जनतेने सहलीला जावून आनंद लुटण्यासाठी याना निवडून दिले का ? असा सवाल करून मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेत्रुत्वात नगरपरिषद मधे अनोखे आंदोलन करण्यात आले. जे नगरसेवक सहलीला गेले होते त्यांचा शोध घेवून त्यांना बेशरम च्या फुलांचा गूच्चा व त्यांची आरती ओवाळून त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकारी यांना ते नगरसेवक मिळाले नाही पण नगराध्यक्ष अहेतेशाम अली मिळाले त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देवून आम्ही आणलेले बेशरमचे फुल नगरसेवकांना द्या व त्यांना शहरातील जनतेचा आक्रोश कळवा असे आवाहन केले.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी  नगरपरिषदच्या पायऱ्या व जिन्यावर दिवे लावून “नगरसेवक हाय हाय” हे नारे देवून आगळे वेगळे आंदोलन केले. मनसेच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची वरोरा शहरात मोठी चर्चा असून त्या नगरसेवकांत भीती निर्माण झाल्याची माहिती आहे, या प्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव डहाणे. शरद मडावी, शहर उपाध्यक्ष अजिंक्य नरडे, लक्ष्मीकांत थेरे मोहसीण सय्यद व इतर मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here