Home चंद्रपूर सनसनिखेज:- आता जिल्ह्यातील अवैध व्यवसायी गुंडांना ठोकून काढणार, ना.वडेट्टीवार यांचे पोलिसांना निर्देश.

सनसनिखेज:- आता जिल्ह्यातील अवैध व्यवसायी गुंडांना ठोकून काढणार, ना.वडेट्टीवार यांचे पोलिसांना निर्देश.

 

जिल्ह्यातील सर्व अवैध दारू तस्कर व अवैध व्यवसायी गुंड पोलिसांच्या रडारवर?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून चोर लूचक्के बदमाश व गुंड हे अवैध दारू व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून स्वतःला एकमेव गुंड व दादा समझन्याच्या नादात एकमेकांचा खून करणे सुरू आहे. त्यात महत्वाचे उदाहरण म्हणजे बल्लारपूरात भरदिवसा अवैध धंद्याच्या स्पर्धेतून सूरज बहुरीया यांचा अमन अंडेवार व साथीदारांनी केलेला खून, यामधे अवैध दारूच्या व्यवसायातील स्पर्धे तून खून झाल्याचे उघड झाले तोच रयतवारी येथे दोघांचा खून आणि आता मनोज अधिकारी यांचा आपसी दुष्मनीतून खून. या खुनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडायला लागली असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पोलिसांना निर्देश दिले की जिल्ह्यात कुठलेही गुंड बाहेर फिरता कामा नये जो कुणी गुंडगिरी करेल त्याला ठेचून काढा.
आता जिल्ह्यात अवैध कोळसा चोरीत असलेले व्यवसायीक गुंड दारू तस्करी,सट्टापट्टी व अवैध सुगंधी तंबाखू या धंद्यात शिरले असल्याने तिथे स्पर्धा सुरू झाली त्यामुळे एकमेकांचा खून करण्यापर्यंत स्थिती पोहचली असल्याने अवैध व्यवसायी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

Previous articleखा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व
Next articleचिंताजनक :- आज पाच कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 239 नव्या बाधितांची नोंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here