Home कोरपणा खा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आमदार सुभाष धोटे...

खा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व

कोरपना – तालुक्यातील गडचांदूर येथील बाबुराव फूलेश्वर शेडमाके चौकात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध सभा घेण्यात आली. व राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. देशातील काँग्रेससारख्या जुन्या प्रमुख विरोधी राष्ट्रीय पक्षातील मुख्य नेत्याला अशा प्रकारची वागणूक म्हणजे देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रकार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी निषेध नोंदविताना म्हटले. दूरदर्शन वरील अभिनेत्रीला विशेष महत्त्व असून सामान्य लोकांना पायदळी तुडवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत असल्याचाही आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला.
दरम्यान केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी विरोधी बिल मंजूर केले. या बिलामुळे देशातील शेतकऱ्यांचे खच्चीकरण होणार असून व्यापारी वर्गाला लाभ देणारे हे बिल आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येणार आहे. व्यापारी वर्गाला मनमानी करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा परवानाच जणू काही या कायद्यामुळे देण्यात आला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी या बिलाविरुद्ध आवाज उठवून शेतकरी विरोधी बिल रद्द करण्याची मागणी करण्याचेही आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
यावेळी निषेध सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोहितकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, नगराध्यक्ष सविता टेकाम गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, पापय्या पोन्नमवार, नोगराज मंगरूळकर, शिवकुमार राठी, बापूराव गोरे, बाबाराव पुरके, आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव मकसुद सय्यद, उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रुपेश चुधरी, अहेमद भाई, मनोहर बुऱ्हान, अभय मुनोत, बाबुराव शेरकी, शिवाजी वांढरे, प्रितम सातपुते, रोहित शिंगाडे, विवेक येरणे, प्रवीण झाडे, बळीराम ताडे, मारोती जुमनाके, सचिन भोंगळे, संतोष देवाडकर, कौस्तुभ येरणे, श्रीकांत धर्मापूरी, अंकित चन्ने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर यांनी केले तर आभार गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे यांनी मानले. दरम्यान पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleमाझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत माननीय प्रियंका जी पवार मॅडम उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी श्री नारायण हिवरकर उपसरपंच कन्हाळगाव यांच्या कुटुंबाला भेट दिली
Next articleसनसनिखेज:- आता जिल्ह्यातील अवैध व्यवसायी गुंडांना ठोकून काढणार, ना.वडेट्टीवार यांचे पोलिसांना निर्देश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here