Home चंद्रपूर चिंताजनक :- आज पाच कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 239 नव्या बाधितांची...

चिंताजनक :- आज पाच कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 239 नव्या बाधितांची नोंद.

 

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3862, जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 10753 वर

कोरोना अपडेट :-

चंद्रपूर, दि. 2 ऑक्टोंबर: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 239 नवीन बाधितांची नोंद झाली असून उपचाराअंती सर्वाधिक 539 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच, मध्यंतरी करण्यात आलेली जनता संचार बंदी यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती संथ झाली आहे, बाधित होण्याचा दर मंदावला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, तसेच हात सॅनीटायजर अथवा साबणाने स्वच्छ करावे. दैनंदिन कामे करताना शारीरिक अंतर राखावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 753 वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 729 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 862 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, रामनगर, राजुरा येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू नवरगाव, सिंदेवाही येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, पाचवा मृत्यू महात्मा गांधी वार्ड, बल्लारपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 29 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील मृत्यू झालेल्या पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. चवथ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, पाचव्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 162 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 153, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 152 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील 10, कोरपना तालुक्यातील चार, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, नागभीड तालुक्यातील आठ, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील आठ, राजुरा तालुक्यातील 14 असे एकूण 239 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून तुकूम, जीएमसी परिसर, बालाजी वार्ड, ऊर्जानगर, दुर्गापुर, भानापेठ, शास्त्रीनगर, राजकला टॉकीज परिसर, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसर, जल नगर, समाधी वार्ड, रामाळा तलाव, नगीना बाग विठ्ठल मंदिर वार्ड, रामनगर, भिवापूर वार्ड, सरकार नगर, बाबुपेठ, अंचलेश्वर गेट परिसर, दादमहल वार्ड, पडोली, गंजेवार्ड, महाकाली कॉलरी, घुटकाळा वार्ड, स्नेहनगर, सिस्टर कॉलनी परिसर, इंदिरानगर, महसूल भवन परिसर, जयराज नगर तुकुम, श्रीराम वार्ड, सुमित्रा नगर, सिंधी कॉलनी परिसर, घुग्घुस या भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, टिळक वार्ड, किल्ला वार्ड, बालाजी वार्ड, सुभाष वार्ड, गांधी वार्ड, बामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेगाव, गांधी वार्ड, आझाद वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

मुल तालुक्यातील विरई, तसेच शहरातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर 16 परिसरातून बाधित पुढे आले आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदूर, उपरवाही भागातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, हनुमान नगर, हेटी खामखुरा, संत रवीदास चौक, हळदा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील प्रगती नगर, गिरगाव, पेंढरी, बाळापुर, नवखळा, तलोढी भागातून बाधित ठरले आहे.वरोरा तालुक्यातील गजानन नगर, जिजामाता वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसर, श्रीकृष्ण नगर, सूर्य मंदिर वार्ड, चंदनखेडा,माजरी, सावरकर नगर, झिंगोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.सावली तालुक्यातील निफंद्रा भागातून बाधित ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील पोस्ट ऑफिस परिसर, रामपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

Previous articleसनसनिखेज:- आता जिल्ह्यातील अवैध व्यवसायी गुंडांना ठोकून काढणार, ना.वडेट्टीवार यांचे पोलिसांना निर्देश.
Next articleधक्कादायक :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे चक्क महापौर कंचर्लावार यांनीच केले उल्लंघन,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here