राजकीय वर्तुळात शोककळा, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पासवान यांच्या निधनाने समीकरण बिघडले
राजकीय निधन वार्ता :-
एलजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले असून राष्ट्रीय राजकारणात शोककळा पसरली आहे. बिहार राज्याचे नेत्रुत्व करणाऱ्या एलजेपी राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय राजकारणात केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळवून नेहमीच महत्वाची भूमिका निभवली आहे. आता बिहार राज्यात विधानसभा निवडणुका लागल्या असून त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर रामविलस पासवान यांचे निधन म्हणजे भाजप व जेडीयू यांच्या युतीला मोठा धक्का बसण्याची संभावना आहे.
रामविलास पासवान यांचा जन्म बिहार राज्यातील खगडिया इथे 5 जुलै 1946 ला झाला, त्यांची आज गुरुवारला सायंकाळी वयाच्या 74 व्या वर्षी प्राणज्योत मालवली त्यांचे पुत्र आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी याबाबत पुष्टि केली असून चिराग पासवान यांनी आपल्या ट्वीट मधे लिहीले की “पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं. Miss you Papa…”.