Home वरोरा राजकीय वार्ता :- माजी नगरपरिषद सभापती शरद मडावी यांचा समर्थकांसह मनसेत प्रवेश.

राजकीय वार्ता :- माजी नगरपरिषद सभापती शरद मडावी यांचा समर्थकांसह मनसेत प्रवेश.

 

जेष्ठ नेते रमेश राजूरकर व मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष कार्यक्रमात घेतला प्रवेश.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी वरोरा तालुका व शहरात सध्या जोरात सुरू असून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या प्रखर नेत्रुत्वावर विश्वास ठेवून एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस मधे असताना वरोरा नगरपालिका निवडणुकीतमधे तब्बल दोन वेळा निवडून येवून सभापती पद भोगलेले व त्यांच्या पत्नीला एकदा निवडून आणणारे शरद मडावी यांनी मनसेचे जेष्ठ नेते व यशस्वी उद्दोजक रमेश राजूरकर आणि मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थकांसह मनसेत प्रवेश घेतला. या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

स्थानिक बावने मंगल कार्यालयात झालेल्या मनसेच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष वाढविण्याच्या द्रुष्टीने विचारमंथन करण्यात येऊन वरोरा शहरात प्रत्त्येक वार्डात पक्षाची शाखा तयार करण्याबाबत शहर उपाध्यक्ष यांना जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांनी आदेश देवून येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन केले व येणाऱ्या काळात होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांत शहर अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी घोषित होईल असे जाहीर केले तर मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ऊद्दोग करावा व समाजातील प्रश्न पक्षाच्या झेंड्याखाली सोडवावे असे आवाहन केले, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद, सौरभ खापने, अजिंक्य नरडे, अमोल सातपुते, लक्ष्मीकांत थेरे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक अतुल पारौधे, हिमालय मडावी, नितीन सातपुते, राजू गोवर्धन, सूरज नागभिडकर अतुल वानखेडे, विशाल नागभिडकर, उमेश येटे, शंकर धाबेकर, शेषराव भोयर, निखिल पटेल, सुभाष हिवरकर, प्रभाकर दळने, मुकेश चांदेकर, आनंद गेडाम इत्यादींची उपस्थिती होती, बैठकीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी मार्गदर्शन करून शरद मडावी यांच्या पुढील पक्ष कार्यासाठी शुभेछा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here