सूरज पांडे, प्रतीक सदनपवार, सलमान पठाण, शब्बीर शहा, गौरव बंडिवार,किट्टू जयस्वाल, रज्जा शेख या दारू तस्करांचा समावेश?
पोलीस पंचनामा भाग – 3
गडचांदूर पोलीस स्टेशन मधे जेव्हापासून गोपाल भारती ठाणेदार म्हणून रुजू झाले तेव्हापासून दारू तस्करी, सट्टापट्टी, जुगार व सुगंधीत तंबाखू ची रेलचेल वाढून गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे, खरं तर या सर्व अवैध धंद्यावर एकीकडे स्थानिक पोलीस स्टेशन मधून कारवाई व्हायला हवी असताना या अवैध धंद्यावर जिल्हा स्थरावर एलसीबी पोलीस पथकाकडून धाडी टाकल्या जातात आणि मग ते आरोपी स्थानिक गडचांदूर पोलीस स्टेशन मधे आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. महत्वाची बाब म्हणजे एलसीबी पथकांनी गुन्ह्यात ज्या आरोपींना पकडले असते व काही आरोपी फरार असते त्या आरोपींना मग स्थानिक गडचांदूर पोलीस स्टेशनमधे अटक करायची की करायची नाही ? हे आरोपी कडून मिळालेल्या रक्कमेवर अवलंबून असते व ज्यांनी मोठी रक्कम दिली त्यांना परस्पर सोडले जाते असे कितीतरी आरोपी हे गडचांदूर पोलीस स्टेशनमधे गुन्हे दाखल असताना सुद्धा मोकाट फिरत आहे व ते चक्क पोलीस स्टेशन मधे जातात व बोलणी करतात, प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर जेंव्हा अवैध दारूची वाहतूक गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत होते, तेंव्हा हे दारू तस्कर तैनात पोलिसांना रस्त्यांवर थांबू नका असा आदेश करतात व तैनात पोलीस त्यामुळे आपली जागा बदलवीतात, अर्थात जेंव्हा ठाणेदारच अवैध दारू तस्करीत सहभागी असेल तर मग त्या बिचाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची काय मजाल ?
गडचांदूर पोलीस स्टेशन मधे सूरज पांडे,(जो दोन दिवसापूर्वी पकडल्या गेला आहे) प्रतीक सदनपवार, सलमान पठाण, शब्बीर शहा, गौरव बंडिवार,किट्टू जयस्वाल, रज्जा शेख या व अशा अनेक दारू तस्करी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल असून सुद्धा ते पोलिस स्टेशन च्या रेकार्डवर अनेक गुन्ह्यात फरार असल्याचे दाखविण्यात आले असताना ते खुलेआम शहरात फिरत आहे व त्यांच्या समर्थकांना पोलीस स्टेशन मधे काही कामात मदत लागली तर हे फरार आरोपी स्वतः पोलीस स्टेशन मधे जावून त्यांचे काम करतात म्हणजे गडचांदूर पोलीस स्टेशन हे अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करीत आहे हे शीद्ध होते आणि त्यासाठी ठाणेदार भारती हे जबाबदार असून त्यांच्या हप्ताखोरीमुळेच पोलिसांच्या अस्मीतेवर आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने ठाणेदार भारती यांची उचलबांगडी करावी अशी मागणी होत आहे.