Home चंद्रपूर चिंताजनक :- 24 तासात पुन्हा 126 बाधित आले पुढे; एका बाधिताचा मृत्यू,...

चिंताजनक :- 24 तासात पुन्हा 126 बाधित आले पुढे; एका बाधिताचा मृत्यू, उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2940

 

आतपर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या पोहचली 11890 वर

कोरोना अपडेट :-

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 126 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 890 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 8 हजार 769 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 940 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भिवापूर वार्ड बाबुपेठ, चंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे.या बाधिताला 7 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 181 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 172, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 29, बल्लारपूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील 17, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील 16, नागभीड तालुक्यातील 24, वरोरा तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 6, सिंदेवाही तालुक्यातील 11, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 126 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील एकोरी वार्ड, नगीनाबाग, जुनोना चौक शांतीनगर, बाबुपेठ, रामनगर, आरवट, श्रीराम नगर, जगन्नाथ बाबा नगर, जटपुरा वार्ड, महाकाली वार्ड, पठाणपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, अंचलेश्वर वॉर्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, बामणी, गणपती वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील माला कॉलनी परिसर, जवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील शेबंळ, आनंदवन, चिनोरा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर, चिखलगाव, खेड, बालाजी लेआउट परिसर, अर्जुनी मोरगाव, चौगान, देलनवाडी, कुरझा, शांतीनगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलनी परिसर, चिचोर्डी, श्रीराम नगर, सूर्य मंदिर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, पळसगाव, देवाडा, लोनवाही, मुरमाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, चिखलगाव, जीवनापूर, गिरगाव,कोजबी, वाढोणा, प्रियदर्शनी चौक परिसर, महात्मा फुले चौक, डोंगरगाव, वढोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील राजोली परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here