Home वरोरा संतापजनक :- वन्य प्राण्यापासून झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई वनविभाग देणार कधी...

संतापजनक :- वन्य प्राण्यापासून झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई वनविभाग देणार कधी ?

 

माजी प्रहार शेतकरी तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांचे वनविभागाकडे निवेदन, आंदोलनाचा इशारा.

तालुका प्रतिनिधी:-

सण 2019-2020या वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात माहे जून महिन्यात शेतपिकाची लागवट केली होती. त्या पिकाला माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात फळ फुले येण्यास सुरुवात झाली. मात्र जंगली जनावराच्या हैदोसाने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान केले होते व त्याचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी टेमुर्डा व वरोरा येथे अर्ज सादर केले होते मात्र आज एक वर्ष होऊनही शेतकरी शासनाच्या आर्थिक नुकसान भरपाई पासून वंचित आहे,
त्यामुळे आज जंगली प्राण्यांपासून झालेले नुकसान मिळावे म्हणून शेतकरी यांना घेवून शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्याकडे निवेदन देवून शेतकऱ्यांना थकीत नुकसान भरपाई द्या अन्यथा आपल्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला, याप्रसंगी शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे सेवक उपस्थित होते.

Previous articleचिंताजनक :- 24 तासात पुन्हा 126 बाधित आले पुढे; एका बाधिताचा मृत्यू, उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2940
Next articleलक्षवेधी :- सर्वसामान्यांना वेठीस धरणारी अशी बकवास दारूबंदी काय कामाची ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here