Home चंद्रपूर लक्षवेधी :- सर्वसामान्यांना वेठीस धरणारी अशी बकवास दारूबंदी काय कामाची ?

लक्षवेधी :- सर्वसामान्यांना वेठीस धरणारी अशी बकवास दारूबंदी काय कामाची ?

 

लक्षवेधी :-

मागील भाजप – शिवसेना युती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा जो निर्णय सन 2015 मधे घेतला तो येथील सर्वसामान्यांना वेठीस धरणारा व येथील रोजगार उध्वस्त करणारा ठरला आहे, या निर्णयाविरुद्ध दारू विक्रेते हे उच्च न्यायालयात गेले पण तिथे ते हरले आणि आता सर्वोच्य न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट व प्रलंबित आहे.मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी आपण उठवणार याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. अभय बंग यांनी चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून साकडे घातले. खरं तर सरकारच्या धोरणात्मक निर्णयात न्यायालय हे ढवळाढवळ करीत नाही त्यामुळे जर सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला तर न्यायालयात त्याबाबत सकारात्मक निर्णय लागून दारूबंदी उठू शकते पण एकीकडे राज्याचा राजस्व महत्वाचा की डॉ, प्रकाश आमटे व डॉ. अभय बंग यांची मागणी महत्वाची या पेचात सद्ध्या उद्धव ठाकरे सरकार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सन 1993 पासून दारूबंदी सुरू आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात ती सन 2015 पासून आहे, या दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी हटली तर शासनाच्या तिजोरीत दरवर्षी किमान 2 ते 3 हजार कोटीचा महसूल मिळू शकतो, ज्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या विकासकामाला हातभार लागू शकतो, शिवाय बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली त्यात रोजगार सुद्धा तयार होऊन बाजारात असलेली मंदी कमी होऊ शकते पण याचा विचार न करता दारूबंदी उठवू नका या ज्या आरोळ्या उठत आहे त्या खरोखरंच सात्विक आहे का ? की त्यामागे कोणी बोलवीता धनी आहे ? हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. कारण जर दारूबंदी आहे तर मग जिल्ह्यात दारू खुलेआम येते कशी ? आणि जर जिल्ह्यात दारूबंदी असताना जर दारू येते तर ही दारूबंदी कशी ? याचे मंथन सरकारने तर करावेच पण डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. बंग यांनी सुद्धा करावे, खरं तर या दोन्ही समाजसेवकांनी या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी उठवू नये ही मागणी करण्यापेक्षा या दोन्ही जिल्ह्यात व्यसनमुक्ती करण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करणे अभिप्रेत आहे, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जनतेने काय खाऊ नये आणि काय पिऊ नये हे समाजसेवक व त्यांच्यामाध्यमातून शासन ठरवणार का ? हा विचार सुद्धा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महत्वाचा आहे. ज्या अर्थी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू विक्री जोरात आहे, मग दारूबंदी करून फायदा काय ? आणि या माध्यमातून जे चोर लूचक्के, गुंड बदमाश हे अवैध दारू व्यवसायात शिरल्याने ते पोलिसांची हत्त्या करताय व पोलिसांवर हात ऊगारतात तर मग असली बकवास दारूबंदी करून फायदा तो काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here