Home चंद्रपूर खळबळजनक :- बलात्कार पिडीत मुलीवर चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ अनोळखी ईसमाचा...

खळबळजनक :- बलात्कार पिडीत मुलीवर चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ अनोळखी ईसमाचा प्राणघातक हल्ला ?

 

रयतवारी भागातील गणेश ट्रेडिंग किराणा दुकानात काम करत असलेल्या मुलीवर मालक उत्तम धृवप्रसाद गुप्ता यांनी केला होता बलात्कार,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

रयतवारी भागातील गणेश ट्रेडिंग किराणा दुकानात काम करत असलेल्या एका 23 वर्षीय मुलीवर दुकान मालक उत्तम धृवप्रसाद गुप्ता यांनी रात्रीच्या वेळेस आपल्या राहत्या घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना काही दिवसापूर्वी लॉक डाऊन च्या काळात घडली असून आरोपी उत्तम धृवप्रसाद गुप्ता हा अटकेत आहे व त्याला जामीन मिळावा म्हणून अनेक राजकीय व इतरांकडून  दबाव पोलिसांवर टाकल्या जात आहे. शिवाय मुलीला तिची तक्रार मागे घेण्यात यावी यासाठी लाखो रुपयाची ऑफर सुद्धा आरोपीच्या वडिलांकडून मुलीला येत असताना ती मुलगी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यामुळेच तिच्यावर गुंडा कडून हत्त्या करण्याचा कट रचला जात असल्याचे चित्र असून चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ बलात्कार पिडीत मुलीवर हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी असलेल्या व्यक्तींनी सांगितले की पीडित मुलीला मारण्यासाठी भरधाव वेगाने दुचाकीस्वार आले व तिच्यावर हल्ला करण्यास हात ऊगारणार एवढ्यात त्या मुलीने झटका मारून ती दूर झाली, या घटनेची तक्रार पिडीत मुलीने रामनगर पोलीस स्टेशन मधे दिली असून आरोपीच्या वडिलांनी किंव्हा इतरांनी पिडीत मुलीवर हल्ला करण्याची सुपारी तर दिली नसावी ? असा संशय येत आहे,

Previous articleचिंताजनक :- 24 तासात 315 नवीन कोरोना बाधित; तीन बाधितांचा मृत्यू.
Next articleशैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले घवघवीत यश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here