Home वरोरा शैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले घवघवीत यश.

शैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले घवघवीत यश.

 

घवघवीत यशाबद्दल जेष्ठ पत्रकार गांधी बोरकर यांचे पुत्र स्पंदन याचे सर्वत्र अभिनंदन !

वरोरा :

एकीकडे संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोचिंग क्लासेस च्या विळख्यात अडकली असताना दुसरीकडे मात्र परंपरागत पद्धतीने घरीच अभ्यास करून राज्य स्तरांवर च्या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी नाही, अशातच अल्पशिक्षित परिवारात जो विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतो त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला खरं तर सलामीच द्यायला हवी, असेच यश संपादन केले ते स्पंदन गांधी बोरकर या विद्यार्थ्यांनी, आपल्या सातवा वर्ग शिकलेल्या आजीच्या मार्गदर्शनात स्पंदन ने महाराष्ट्र राज्य शासकीय परिक्षा परिषद पुणे , पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी च्या आयोजित फेब्रुवारी 2020 शिष्यवृत्ती परिक्षेत त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. वरोरा येथील सेन्ट अॅनिस हायस्कूल मधिल इयत्ता 6 वी चा विद्यार्थी स्पंदन शालिनी गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यसह यश प्राप्त तर केलेच शिवाय स्पंदन ची नवोदय विद्यालय बाळापुर तळोधी येथे प्रवेशासाठी सुध्दा निवड झालेली आहे. स्पंदन ने संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल सेन्ट अॅनिस हायस्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक वूंद, मित्र परिवार तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. स्पंदन ने त्याच्या यशाचे श्रेय आजी अनुसयाबाई वाघमारे , मुख्याध्यापक , सर्व शिक्षक वूंद आणि आईवडिलांना दिले आहे.

Previous articleखळबळजनक :- बलात्कार पिडीत मुलीवर चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ अनोळखी ईसमाचा प्राणघातक हल्ला ?
Next articleदुर्दैवी घटना :- खुशाल डहाळकर यांच्यासह त्यांना दुचाकीने धडक देणाऱ्या प्रतीक डंभारेचा मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here