Home वरोरा दुर्दैवी घटना :- खुशाल डहाळकर यांच्यासह त्यांना दुचाकीने धडक देणाऱ्या प्रतीक डंभारेचा...

दुर्दैवी घटना :- खुशाल डहाळकर यांच्यासह त्यांना दुचाकीने धडक देणाऱ्या प्रतीक डंभारेचा मृत्यू.

 

खांबाडा महामार्गावर मॉर्निंग वॉकला निघालेल्या डहाळकर यांचे नागपूर ला नेताना रस्त्यातच निधन.

वरोरा प्रतिनिधी :-

रस्ते अपघातात नेमके काय? कुठे? कसे ? प्राण जाईल याचा नेम नसते हे काल घडलेल्या अपघातातून शीद्ध झाले आहे, प्रतीक डंभारे वय १९ वर्ष  हा खांबाडा येथून टी ई टि परीक्षेसाठी चंद्रपूर ला जात होता, तर खुशाल डहाळकर वय ४९ वर्ष  हे सकाळी मॉर्निंग वॉक ला निघाले होते, दरम्यान प्रतीक यांची दुचाकी अती वेगात असल्याने त्यांचे गाडीवर चे नियंत्रण सुटले आणि त्याने खुशाल डहाळकर यांना मागून जोरदार धडक दिली असता प्रतीक हा रस्त्याच्या डिवायडरवर आपटला व जागीच तो ठार झाला तर खुशाल डहाळकर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ नागपूर येथील रुग्णालयात नेत असताना मधेच त्यांनी जीव सोडला, ही घटना सकाळी अंदाजे ६:०० वा, दिं.१४/१०/२०२०रोजी घडली असून खांबाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous articleशैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले घवघवीत यश.
Next articleदणका :- महिलांच्या आंतरवस्त्रांचे प्रदर्शन करून महिलांची अब्रू घालविणाऱ्या दुकानदारांना मनसे महिलांचा दणका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here