Home नागपूर दणका :- महिलांच्या आंतरवस्त्रांचे प्रदर्शन करून महिलांची अब्रू घालविणाऱ्या दुकानदारांना मनसे महिलांचा...

दणका :- महिलांच्या आंतरवस्त्रांचे प्रदर्शन करून महिलांची अब्रू घालविणाऱ्या दुकानदारांना मनसे महिलांचा दणका.

 

मनसेच्या नागपूर शहर उपाध्यक्षा कल्पना चव्हाण यांच्या इशाऱ्या नंतर अनेक कापड व्यवसायिकांनी दुकानाबाहेरील पुतळे काढले.

नागपूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने तर्फे पोलिस आयुक्त, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मनपा चे सर्व सहाय्यक आयुक्त यांना निवेदनाव्दारे शहराच्या हद्दीत असलेले विविध कापड व्यावसायिक जसे माॕल मधील कापड शोरूम, होजीयरी दुकानदार, रस्त्याच्या कडेला शहरात वाढलेले ड्रेस मटेरियल विकणारे दुकानदार, हातठेले इत्यादिंकडून महिलांचे अंतरवस्त्र विक्रि करतांना नियम धाब्यावर बसवून प्लास्टिक, मेटल किंवा इतर मटेरियल पासून महिलांच्या आकाराचे अर्धकृती अथवा पूर्णाकृती पुतळे वापरून त्यांचेवर अंतरवस्त्र परिधान करून दुकानाबाहेर, रस्त्यावर टांगलेले किंवा उभारलेले दिसत होते.

तसेच सदर वस्त्रांच्या विक्रिसाठी जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या नट नटींचे अंतरवस्त्र चित्रे कार्डबोर्ड, फ्लेक्सवर छापून व्यावसायिक स्वतःच्या आस्थापनांसमोर लावून महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढित होते. यामुळे दुकानदार व माॕल व्यावसायिकांना पैसे कमावतांना महिलांचा आदर करायचा विसर पडलेला दिसत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नागपूर शहर उपाध्यक्षा कल्पना चौव्हाण यांच्या नेत्रुत्वात नियमांचा आधार घेऊन शहरातील सर्व लहान-मोठ्या कापड व्यावसायिकांना योग्य पद्धतीने विना प्रदर्शनी करता महिलांचा योग्य आदर राखून व्यवसाय करण्याचा निर्वाणीचा सल्ला देण्यात आला होता व पुढिल सात दिवसात शहरातील कापड आस्थापना धारकांनी दुकानाबाहेर अशी आक्षेपाह्य आंतरवस्त्र परिधान पुतळे, कटआऊंट्स अथवा फ्लेक्स वापरल्यास महिला सेना कायदा हातात घेऊन व्यावसायिकाचे तोंडाला काळे फासून आक्षेपार्ह्य पुतळ्याचे दहन करेल, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सदर दुकानदार व त्यांचेवर नियंत्रण ठेवणारी महानगर पालिकेचा आस्थापना विभाग जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले होता.

सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेत अनेक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दुकांदारांसोबत बैठक लावून तात्काळ आक्षेपार्ह्य पुतळे काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काही दुकानदारांनी आक्षेपार्ह्य पुतळे काढून दुकानातील अंतर्गत भागात लावले परंतु काही मुजोर दुकानदारांनी ह्याची दखल घेतली नाही हे लक्षात येताच दि. १०.१९.२०२० रोजी संध्याकाळी ४ ते ७ ह्या वेळेत विविध बाजारात जसे शक्करदारा, महाल, गांधीबाग इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपशहर अध्यक्षा कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी आक्षेपार्ह्य अंतर्वस्त्र परिधान करून ठेवलेल्या पुतळ्यांना महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काढून दूकानात फेकले व ह्यापुढे हे पुतळे परत दर्शनी भागात दिसले तर दुकान सुरु करू देणार नाही असा सज्जड दम देण्यात आला.

आंदोलनादरम्यान पोलीस विभागाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या अध्यक्षा मा. सौ. रिटाताई गुप्ता यांच्या मार्गदर्शनात तसेच उपशहर अध्यक्षा सौ. कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या आंदोलनात शहर अध्यक्षा सौ. संगीता ताई सोनटक्के, श्रीमती अचला मेसन, सौ. यांचा तसेच मोठ्या संख्येत महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here