Home चंद्रपूर धक्कादायक :- बलात्कार करणाऱ्या त्या गणेश ट्रेडिंग मालकाच्या दुकानात विकल्या जातो अवैध...

धक्कादायक :- बलात्कार करणाऱ्या त्या गणेश ट्रेडिंग मालकाच्या दुकानात विकल्या जातो अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका?

 

रयतवारी कॉलरी परिसरात घरी, गोडाऊन मधे लाखोंचा सुगंधीत तंबाखूघुटका साठा ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री करणाऱ्यांची अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाशी अभद्र युती असल्यामुळे अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री करणारे काही दिवसातच कोट्याधीश झाले आहे, त्यामुळे त्यांना एवढा माज आलाय की ते दुकानात काम करणाऱ्या मुलीवर बलात्कार करायला लागले आहे, असाच दुर्दैवी प्रकार रयतवारी परिसरात घडला असून अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री होत असलेल्या गणेश ट्रेडिंग या दुकानात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय मुलीच्या मजबुरीचा फायदा उचलत दुकान मालक ध्रुवप्रसाद गुप्ता यांच्या उत्तम गुप्ता या मुलाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला,

गणेश ट्रेडिंग या दुकानात अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही वेळा अन्न औषध प्रशासनाच्या टीम ने व पोलिसांनी धाडी पण टाकल्या मात्र नंतर त्यांचा हप्ता ठरला आणि आता तिथे राजरोसपणे अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री जोरात सुरू आहे, अर्थात पोलीस प्रशासनासोबत असलेले अर्थपूर्ण सबंध यामुळे दुकानात काम करणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर सुद्धा उलट मुलीवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, मात्र मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने व तिने आक्रमक भूमिका घेतल्याने आरोपी उत्तम गुप्ता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व तो अजून जिल्हा कारागृहात असल्याचे बोलल्या जात आहे. आता आपल्या मुलाची बदनामी झाली म्हणून या अवैध व्यवसाय करणाऱ्या गणेश ट्रेडिंग च्या मालकाने मुलीला ठार मारण्यासाठी कुणाला तरी सुपारी देवून त्या मुलीवर प्राणघातक हमला करण्यात आला पण मुलगी या हमल्यातुन कशीबशी वाचली व तिने रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली, आता प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here