Home नागपूर नागपूर शिक्षण विभागातील भ्रष्टाचारांची चौकशी तत्काळ करा, मनसेची शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू...

नागपूर शिक्षण विभागातील भ्रष्टाचारांची चौकशी तत्काळ करा, मनसेची शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी,

 

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सरचिटणीस महेश जोशी यांच्या नेत्रुत्वात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन,

नागपूर प्रतिनिधी :-

नागपूर विभागात वाढलेला प्रचंड भ्रष्टाचार, रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या मागण्या तसेच विविध शिक्षण अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या चौकश्या अश्या विविध विषयांवर शिक्षण राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांचेशी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस महेश जोशी व शरद भांडारकर यांनी नागपूर बचत भवन येथे सविस्तर चर्चा करून तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून  कारवाईची मागणी केली आहे. नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्रात विविध प्रश्न गेली अनेक वर्षापासून आवासुन उभे आहेत पण त्यांवर शिक्षण विभाग गांभीर्याने विचार न करता व त्यावर तोडगा न काढता उलट ते प्रश्न आणखी गंभीर करीत आहे, पर्यायाने शिक्षण विभागाचा पूर्णतः बट्ट्याबोळ झाला असल्याने या संदर्भात नागपूर विभागातील या ज्वलंत समस्या व प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस महेश जोशी यांनी सोडविण्यासाठी पुढाकार घेवून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले ह्यावेळी शिक्षक सेनेचे उपशहर अध्यक्ष जावेद शेख, नितीन किटे, तारिक अहेमद व रवी बोबडे चर्चेत सहभागी होते.

Previous articleधक्कादायक :- बलात्कार करणाऱ्या त्या गणेश ट्रेडिंग मालकाच्या दुकानात विकल्या जातो अवैध सुगंधीत तंबाखू व घुटका?
Next articleसंतापजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांचे निलंबन करण्याऐवजी बदली का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here