Home गडचिरोली संतापजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांचे निलंबन करण्याऐवजी बदली का...

संतापजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांचे निलंबन करण्याऐवजी बदली का ?

 

(विकास गुप्ता) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन-मध्यम संवर्ग) यांचे मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना दिलेल्या पत्रात घोळ, शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे सुद्धा सोनटक्के यांच्या बदली संदर्भात पत्र?

कुरखेडा प्रतिनिधी :-

सुनील सोनटक्के, वन परिक्षेत्र अधिकारी, कुरखेडा(प्रादेशिक), वडसा वनविभाग यांचेविरुध्द अनेक तक्रारी वन विभागात प्राप्त होत असताना व विभागीय चौकशीत ते दोषी असल्याचे शीद्ध झाले असताना त्यांना तत्काळ निलंबित न करता त्यांच्या बदली करिता गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रही का आहे ? विशेष म्हणजे सत्ताधारी असणाऱ्या शिवसेना जिल्हा प्रमुखांनी सुनील सोनटक्के यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांच्याच पक्षाच्या वनमंत्र्याकडे करायला हवी होती ती न करता त्यांची बदली करावी म्हणून वनमंत्री यांच्याकडे एकप्रकारे शिफारस करण्यात येते म्हणजे नेमके वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चालविले का आहे ? व शिवसेना जिल्हाप्रमुख यांचा या प्रकरणात हस्तक्षेप कशासाठी ? हा प्रश्न सुद्धा आक्षेपार्ह दिसत आहे,

खर तर प्राप्त अनेक तक्रारीनुसार कुरखेडा वन परिक्षेत्रात सन २०१९-२० या वर्षात रस्ते बांधकामाबाबत चौकशी केली असता त्यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी, कुरखेडा (प्रादेशिक) यांनी रु.१४.२४ लक्ष चा अपहार केल्याची बाब प्रथम दर्शनी निदर्शनास आली आहे.त्यामुळे त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम अंतर्गत दोषारोपपत्र बजावण्याची कार्यवाही सुरु आहे, याशिवाय सोनटक्के यांचेविरुद्ध आर्थिक अनियमिततेबाबत अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत असून त्यांची चौकशी उपवनसंरक्षक, बठसा यांचे माध्यमातून वेगळा करण्यात येत असल्याचेही (विकास गुप्ता) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन-मध्यम संवर्ग)यांच्या संदर्मित पत्रात नमुद केले आहे. अशा परिस्थितीच सुनिल विनायकराव सोनटक्के, वन परिक्षेत्र अधिकारी, कुरखेडा (प्रादेशिक), वडसा वनविभाग यांना सदर पदावर कार्यरत ठेवणे उचित ठरणार किंव्हा नाही याबाबत घोळ केला जात असला तरी प्रथम दर्शनी जर ते विभागीय चौकशीत दोषी आढळले आहे तर त्यांच्यावर प्रथम निलंबनाची कारवाई शासन स्तरांवर होणे अभिप्रेत आहे मग त्यांच्या बदली चा प्रश्नच येतो कुठून ? या सर्व स्थितीवरून सोनटक्के यांना वनविभाग व वन मंत्रालय वाचविन्याचा प्रयत्न करीत असल्याचे शीद्ध होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here