Home गडचिरोली अखेर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातम्यांच्या दणक्याने भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के...

अखेर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातम्यांच्या दणक्याने भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के निलंबित !

 

भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा वनविभागातील कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार चौकशीत झाला उघड.

कुरखेडा प्रतिनिधी :-

वडसा वनविभागातील कुरखेडा वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील विनायकराव सोनटक्के यांच्या वनविभागातील विविध योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलमधे बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात वनमंत्री यांना व मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देवून सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती, त्यामुळे मंत्रालय स्तरांवर झालेल्या तक्रारी व विभागीय चौकशीत सोनटक्के यांनी भ्रष्टाचार केल्याचे मिळालेले पुरावे यामुळे सोनटक्के यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

मागील तिन महिन्यापासून भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलने सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण उघडकीस आणले व त्यामुळे त्यासंबंधीच्या तक्रारी वरिष्ठ स्तरापर्यंत पोहचल्या व वरिष्ठांनी या संदर्भात उशिरा का होईना सोनटक्के यांना निलंबित केले व मंत्रालयापर्यंतची धडपड व सगळ्यांना मैनेज करण्याची खेळी अखेर कुचकामी ठरली, भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर येणाऱ्या बातम्या ह्या वस्तुस्थितीला धरून असते हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे.

भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासहित वृत्त मालिका प्रकाशित करण्यात आली होती व त्यासंबंधात तक्रारीही झाल्या होत्या मात्र भ्रष्ट सोनटक्के यांनी आपली मोहमाया व लागेबांधे याचा वापर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, व संपादकांच्या विरोधात काही दीड दमडीचे पत्रकार ? यांना पैसे देवून बदनामी करण्याचा प्रयत्न पण केला होता,परंतु अखेर सत्याचा विजय झाला व मंगळवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी सोनटक्के यांचा निलंबनाचा आदेश निघाला. सोनटक्के यांना वाचविण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख यांनी शिफारशी केल्या पण त्या सुद्धा व्यर्थ गेल्या आणि भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल मधून प्रकाशित बातम्यांच्या मालिकामुळे सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here