Home भद्रावती धक्कादायक :- आयुथ निर्माणी हायस्कूलच्या प्राचार्या विरोधात चक्क शिक्षकांची पोलिसात तक्रार?

धक्कादायक :- आयुथ निर्माणी हायस्कूलच्या प्राचार्या विरोधात चक्क शिक्षकांची पोलिसात तक्रार?

 

तीन वर्षापासून मानसिक छळ होत असल्याचा शिक्षकांचा पञपरिषदेत आरोप.

भद्रावती, दि.(तालुका प्रतिनिधी)

येथील चांदा आयुध निर्माणी वसाहतीतील आयुध निर्माणी हायस्कुलच्या प्राचार्याविरोधात चक्क 29 शिक्षकांनी दि.19 ऑक्टोबर रोजी भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल करून मागील तीन वर्षांपासून प्राचार्य एम.रंगा राजु आमचा मानसिक छळ करीत असल्याचा आरोप पञपरिषदेत केला.
अखिल भारतीय आयुध निर्माणी शिक्षक कर्मचारी संघाच्या भद्रावती शाखेचे अध्यक्ष किशोर पावडे यांनी पञपरिषदेत सांगितले की, प्राचार्य एम.रंगा राजु हे मागिल तीन वर्षांपासून शाळेतील सहकारी शिक्षकांचा मानसिक छळ करीत आहेत. तसेच शालेय कारभार शासनाच्या निर्देश व नियमानुसार न करता आणि प्रशासनाला न जुमानता स्वमर्जिने, नियमबाह्य पद्धतीने चालवत आहेत. शिक्षकांना विविध प्रकारे धमक्या देवुन आक्षेपार्ह भाषेचा वापर करतात. शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर समोर प्रार्थना सभेत, शिक्षक सभेत तसेच शालेय कार्यक्रमात शिक्षकांना क्रिमीनल, डेंजरस फाॅर सोसायटी, नालायक, इनकॅपॅबल, इडियट, नानसेंस, आय विल नाट स्पेअर एनीवन, आय विल टेक रिवेंज, आय अॅम अ किंग अॅन्ड यू ऑल माय स्लेव्हज अशा प्रकारचा शब्दांचा वापर करून सतत दबावात ठेवतात. एवढेच नाही तर वारंवार नोकरीवरून काढण्याची, सर्विस रेकॉर्ड खराब करण्याची, आयुष्य उद्ध्वस्त करण्याची, पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची व जिवे मारण्याची धमकी देतात असाही आरोप पञपरिषदेत करण्यात आला. प्राचार्य रंगा राजु यांनी शिक्षकां विरोधात खोट्या तक्रारी करण्याकरीता विद्यार्थी आणि पालकांना प्रवृत्त केले असुन प्रशासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. शाळेतील शिक्षक नागलवाडे यांच्या विरोधात चोरीचा आळ घेतला गेला व विद्यार्थ्यांकडून बनावटी तक्रारी दबावात घेतल्या. परंतु सदर प्रकरणाची विभागीय चौकशी केली असता नागलवाडे दोषमुक्त झाले. वैद्यकिय परिस्थितीत सुध्दा शिक्षकांची रजा मंजूर केली जात नाही. आजारी शिक्षकाला कार्यालयात बोलाविले जाते व नंतरच त्याला सुट्टी दिली जाते. शिक्षका सौ. धकाते ह्या प्रशिक्षित पदवीधर असताना व त्यांची नियुक्ती हायस्कूलवर असताना त्यांना इयत्ता पाचविचे वर्ग शिकविण्याकरीता दिले. त्यांनी विरोध केला असता त्यांना असभ्य व जातीवाचक शब्दांचा वापर करण्यात आला. खालच्या जातीची असल्याने खालच्या वर्गाला शिकवा असे भर शिक्षक सभेत प्राचार्यांनी खडसावले. दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही तासीका देण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांना रिकामे बसुन रहावे लागत आहे. असेही पञपरिषदेत सांगण्यातआले.
एक दिवस विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याला दोन दिवस वर्गाच्या बाहेर बसविले जाते. त्याला खुप शारिरीक शिक्षा केली जाते. लहान मुलांना बराच वेळ पर्यंत बाथरुमला जाऊ दिल्या जात नाही. त्यांना खुप वेळ ऊन्हात ठेवल्या जाते.या आरोपासह अनेक आरोप पञपरिषदेत करण्यात आले. तसेच नागलवाडे, पावडे आणि चकोले हे शिक्षक दि.17 ऑक्टोबर रोजी प्राचार्यांच्या विरोधात तक्रार देण्याकरिता पोलिस स्टेशनला गेले असता त्यांची तक्रार न घेता त्यांनाच दमदाटी करून सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी हाकलून लावल्याचा आरोपही पञपरिषदेत करण्यात आला.
पञपरिषदेला किशोर पावडे, चंद्रकांत नागलवाडे, सुरेश कुमार भगत, व्ही. गणेश कुमार, भागवत इंगळे, एस. वाय.जाधव, बी. बी.वाकडे, एम.एन.धकाते यांचासह 28 शिक्षक उपस्थित होते.

शिक्षकांचे आरोप खोटेप्राचार्य एम.रंगा राजु*

आमचा शाळेतील शिक्षकांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे असुन त्यांनी सिद्ध करून दाखवावे. मी शाळेसाठीच काम करीत आहे. कोण्या व्यक्ती साठी नाही. मी बाहेरचा असल्यामुळेच मला टारगेट बनविल्या जात आहे. मी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच कार्य करीत आहे. अशी
प्रतिक्रिया प्राचार्य एम. रंगा राजु यांनी त्यांचाशी संपर्क साधला असता दिली.

*मी ‘त्या’ शिक्षकांना समजाविलेए. पी. आय. म्हस्के*

माझ्याकडे जे तीन शिक्षक आले होते, त्यांची तक्रार त्यांच्या प्राचार्यांनी पोलिस स्टेशनला दिली होती. त्यांना मी बोलाविले व आपण शिक्षक आहात असे म्हणून प्राचार्य, शिक्षक आणि पालक एकत्र बसुन वाद मिटवा अशी समज दिली. बाकी काहीही म्हटले नाही. अशी प्रतिक्रिया ए.पी.आय.संतोष मस्के यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here