Home चंद्रपूर ज्वलंत :- प्रथम भाजपने चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचा राजीनामा घ्यावा...

ज्वलंत :- प्रथम भाजपने चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचा राजीनामा घ्यावा ?

 

मग राज्याच्या महिलाबालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांचा राजीनामा मागावा.

लक्षवेधी :-

राज्यात भाजपची सत्ता गेली आणि भाजप चे माजी मुख्यमंत्री व इतर पदाधिकारी हे जणू बिथरले की काय ? असेच एकूण चित्र आहे. जिथे राज्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे रोजगार गेला, हाताला काम नाही म्हणून लोक चिंतेत आहे, त्याकडे भाजप पदाधिकारी यांचे लक्ष नाही. तर सर्वसामान्यांना ज्याचे काही घेणेदेणे नाही त्या मंदिराचे दार उघडा, थाळ्या वाजवा, दिवे लावा. घंटा वाजवा इत्यादी उपद्व्याप भाजप नेते करून राज्यातील जनतेला मूर्ख बनवित आहे, महत्वाची बाब म्हणजे नुकतेच गूगल ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हा मूर्ख म्हणून केला होता जो आधी फेकू पण होता, म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर मोदींची खरी प्रतिमा काय आहे हे जगजाहीर झाली आहे, अशातच स्वतःला सुसंस्कृत समजला जाणारा भाजप पक्ष नको ते आंदोलन करून चुकीचा पायंडा पाडत राज्यातील जनतेला जणू मूर्खाच्या नंदनवनात घिरट्या घालायला लावत आहे,

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या नंतर ही त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली, खरं तर चंद्रपूर महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे आणि त्या महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार ह्या महापौर असताना आणि त्यांच्या नगरसेवक पती व इतर नातेवाईकांचे शहरात मोक्याच्या जागी अतिक्रमण व अवैध बांधकाम असल्याचे सबळ पुरावे असताना व ही बाब भाजप चे जेष्ठ नेते व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहीत असताना एवढेच नव्हे तर त्यांचे वडील डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी वडगाव येथील अवैध अतिक्रमण व बांधकाम संदर्भात कंचर्लावार यांची आयुक्तांकडे तक्रार केली असताना त्यासाठी जबाबदार महापौर राखी
कंचर्लावार यांची उचलबांगडी भाजप का करीत नाही ? काय हा सुसंस्कृतपणा नाही ? चंद्रपूर शहरात एखाद्या सर्वसामान्य व्यक्तींनी अतिक्रमण केले तर जणू महानगर पालिका प्रशासन तत्परता दाखवून ते बांधकाम बुलडोजर लावून तोडतात तर मग महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीचे व नातेवाईकांचे अतिक्रमण व अवैध बांधकाम का तोडल्या जात नाही ?

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार(१९ऑक्टोबर)ला जटपूरा गेट जवळ आंदोलन जे करण्यात आले. त्या जटपुरा गेट जवळ महापौर यांचे नातेवाईक दत्तू कंचर्लावार यांनी जनार्धन मेडिकल च्या मागील चंद्रपूर मनपाच्या जागेवर अतिक्रमण केल ते भाजप च्या पदाधिकाऱ्यांना दिसले नाही का ? आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व ज्या भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले त्या डॉ. गुलवाडे यांचे रुग्णालय बांधकामच अनधिकृत आहे तर मग भाजप डॉ. गुलवाडे यांना पक्षातून बाहेर का करीत नाही ? इथे भाजप चा सुसंस्कृतपणा नेमका जातो कुठे ? हेच कळत नाही,

खरं तर या आंदोलनाचे नेत्रुत्व जिल्हाध्यक्ष (ग्रा)देवराव भोंगळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष(ग्रा)ब्रिजभूषण पाझारे, जिल्हाध्यक्ष(श)विशाल निंबाळकर यांनी केले त्यांनी ना.यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याच्या अगोदर
आपल्या पक्षातील महापौर राखी कांचर्लावार यांचा राजीनामा मागायला पाहिजे कारण त्यांनी आपल्या नातेवाईकांचे जे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण आहे  शिवाय त्यांच्याच अधिपत्याखाली कोविड रुग्णांना भोजणाची व्यवस्था निकृष्ट दर्जाची व अन्नात अळ्या असलेली आहे त्यामुळे अशा व्यक्तीला महापौरपदी ठेवणे हे भाजप च्या सुसंस्कृत धोरणाला तिलांजली देण्यासारखे आहे अर्थात त्यांचा  राजीनामा घेणे भाजपसाठी जास्त सुसंस्कृतपणाचे होईल असे वाटते….

Previous articleधक्कादायक :- आयुथ निर्माणी हायस्कूलच्या प्राचार्या विरोधात चक्क शिक्षकांची पोलिसात तक्रार?
Next articleब्रेकिंग न्यूज :- वरोरा मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे चढले तहसील कार्यालयातील टॉवरवर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here