Home चंद्रपूर दणका :- अखेर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलमधील बातमीच्या दणक्याने दत्तू कंचर्लावार यांना...

दणका :- अखेर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलमधील बातमीच्या दणक्याने दत्तू कंचर्लावार यांना मनपा चा नोटीस,

 

आता संजय कंचर्लावारराजेंद्र कंचर्लावार यांचे बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस मनपा देणार का?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग२४

चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या नगरसेवक पती व दीर यांनी मोक्याच्या जागांवर अतिक्रमण व बांधकाम केल्याबाबत भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर “मनपाचा भ्रष्ट कारभार” या सदराखाली व्रुत्त मालिका सुरू असून सर्वसामान्यांना एक कायदा व सत्ताधाऱ्यांना दुसरा कायदा कसा ? याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल सुरू आहे, अशातच जटपुरा गेट सराई मार्केट मधील जागेवर जनार्धन मेडिकलचे संचालक दत्तू कंचर्लावार यांनी अतिक्रमण केले असल्याने ते अतिक्रमण मनपा का तोडत नाही ? अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या व महापौर राखी कंचर्लावार यांच्या दबावामुळे दत्तू कंचर्लावार यांना महानगर पालिका अभय देत असल्याचा संशय सुद्धा बातम्यांतून व्यक्त करण्यात आला होता, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाची सर्वत्र थू – थू झाली होती आणि शहरातील जनतेत आक्रोश व्यक्त होता, अर्थात सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली होती, पण त्यांना लेखी उत्तर न देता मनपा प्रशासनाचे वेळ काढू धोरण सुरू होते, आता मात्र या प्रकरणाचा उद्रेक होईल या भीतीने मनपा प्रशासनाने भीतभीत का असेना दत्तू कंचर्लावार यांना जनार्धन मेडिकल मागील सराई मार्केट मधील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस जारी केली, त्यामुळे भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचा दणका चंद्रपूर मनपा प्रशासनाला बसला हे स्पष्ट होते, आश्चर्याची बाब म्हणजे एरव्ही अवैध बांधकाम करणाऱ्यांना व तक्रारकर्त्याना घरी पत्र पाठविण्याची पद्धत असताना अतिक्रमणधारक दत्तू कंचर्लावार व तक्रारकर्ते राजेश बेले यांना पोस्टाने पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. आता नोटीस दिल्यानंतर मनपा प्रशासन दत्तू कंचर्लावार यांचे बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम तोडणार का ? शिवाय दत्तू कंचर्लावार यांच्यासह राजेंद्र कंचर्लावार आणि संजय कंचर्लावार यांचे बेकायदेशीर बांधकामाला पाडण्यासाठी नोटीस बजावणार का ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here