संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरा केला दिवाळी उत्सव.
वरोरा प्रतिनिधी :-
संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाले असताना सामजिक सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम दर वर्षी प्रमाणे याही वर्षी वरोरा तालुक्यातील उखर्डा ग्रामवाशीयानी केले असून येथे सामूहिक दिवाळी मोठा जल्लोषात साजरी करण्यात आली. जवळपास ६ महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सराव करून शाळेतील विद्यार्थ्यांनी या विशेष दिवाळी उत्सवात नृत्य सादर केले , शिवाय सामाजिक संदेश देणारे नाटक सादर केले ,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैरागुमुर्ती गाडगे महाराज , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .दिवाळी निमित्त मंदीर परिसरात स्वच्छता करून दिवाळी निमित्ताने रोषणाई करण्यात आली. यामुळे गावात एक प्रकारचे चैतन्यपूर्ण व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, या सामूहिक उत्सवात प्रत्येक व्यक्ती आनंदी झाला या सगळ्या कार्यक्रमासाठी माजी सैनिक प्रमोद फरकाडे, शुभम हिवरकर, अभिजित कुडे, रोशन भोयर, विजय कुडे, विनोद कोठारे, तेजस उरकुडे , योगेश पुसदेकर, अनिकेत राऊत, रंजीत कुडे, तुषार उरकुडे, वैभव पु सदेकर , रुपेश पाल , गजानन देवतळे , नरेश देवतळे, राहूल डोमकावडे, जुबेर शेख , आकाश हिवरकर , अक्षय काटकर , ऋषी विठडे , रंजीत हिवरकर, प्रशांत उरकुडे, अभिषेक लांडगे व समस्त युवक तसेच न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था , भारत माता क्रीडा मंडळ व गुरुदेव सेवा मंडळ चे सर्व तरुण मंडळी यांनी यशस्वी रित्या आयोजन केले.