कोंबड बाजार वर लाखो रुपयाचाजुगार, लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या कोंबड बाजारासाठी ठाणेदार यांना हप्ता किती?
पोलीसपंचनामा भाग– ८
जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला विसरून जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असताना स्वतःच ते कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल भारती यांनी तर कायदा सूव्यवस्थेचे धिंडवडे काढत सर्व अवैध धंदेवाईक यांना एक प्रकारे राजाश्रय देवून आपल्या वर्दीला कलंक लावला आहे.
ठाणेदार गोपाल भारती यांच्या भ्रष्ट लीला अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून चर्चील्या जात असताना दुसरीकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या हे लक्षात येऊ नये एवढे पोलीस प्रशासन दूधखुळे नाही, पण अख्खे पोलीस प्रशासनच जणू भ्रष्ट झाल्यागत दिसत असून वणी येथील कुख्यात सट्टाकिंग हाफीज शेठ यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील हतबल पोलीस प्रशासनाचा फायदा घेत गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांच्यासोबत सेट्टिंग करून गाडेगाव विरूर येथे हप्त्याला तीन दिवस कोंबड बाजार सुरू करण्याची रीतसर परवानगी मिळविली असल्याची माहिती आहे, म्हणूनच मागील शुक्रवारला कोंबड बाजार भरल्यानंतर आज रविवारला सुद्धा मोठा कोंबड बाजार भरणार आहे. विशेष म्हणजे वणी येथून बदली होऊन आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी नायक हे गडचांदूर क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्या देखरेखखाली हा प्रकार चाललाय का ? हे पाहणे महत्वाचे असून जिल्हा पोलिस अधीक्षक आता या संदर्भात काय भूमिका ? घेतात याबद्दल गडचांदूर परिसरातील जनतेला उत्सुकता लागली आहे.